बदलत्या काळानुसार जीन्सवर वेगवेगळ्या पॅटर्न आणि फॅशनचे टॉप घालण्याचा नवा ट्रेंड येतो. प्रत्येक येणाऱ्या नव्या ट्रेंड्सचे हटके पॅटर्नचे टॉप आपल्याकडे असावे असे प्रत्येकीला वाटत असते. सध्या प्लाझो आणि जीन्सवर क्रॉप टॉप घालण्याची नवी फॅशन आली आहे. हे क्रॉप टॉप आपल्याला खूपच हटके लूक देतात. सध्या असे क्रॉप टॉप फारच ट्रेंडी असल्याने प्रत्येकीकडे एखादा तरी क्रॉप टॉप नक्की असतोच. हा क्रॉप टॉप अशा पॅटर्नमध्ये असतो की तो घातल्याने आपल्या पोटाकडचा भाग थोडा उघडा राहतो. पोटाकडचा भाग उघडा ठेवून फॅशन करणाऱ्या या ट्रेंडी टॉपच्या प्रकारालाच 'क्रॉप टॉप' असे म्हणतात(Best Way to Wear Crop Tops Without Showing Your Stomach).
अनेकजणी हा क्रॉप टॉप फॅशन म्हणून घालतात खरे, पण तो घातल्यावर एक अडचण येते. ही अडचण म्हणजे क्रॉप टॉप घातल्यावर आपण हात पाहिजे तसे वर करु शकत नाही. क्रॉप टॉप घातल्यावर जर आपण हात वर केले तर हे टॉप पोटाच्या भागाकडून देखील वर उचलले जाते. यामुळे काहीवेळा चारचौघात (Way to style a crop top without showing stomach) अवघडल्यासारखे होते. यामुळे क्रॉप टॉप घातल्यावर आपण हातांची जरा बारकाईने आणि काळजीपूर्वकच हालचाल करतो. यामुळे क्रॉप टॉप घातल्यावर अवघडल्यासारखेच होऊ नये आणि हे टॉप पोटाकडील भागातून वर उचलले जाऊ नये यासाठीची एक सोपी ट्रिक पाहूयात(How to wear crop tops without showing stomach).
क्रॉप टॉप वर उचलला जाऊ नये म्हणून काय करावे ?
अनेकदा क्रॉप टॉप घातल्यावर हातांची हालचाल केली हात वर केले की हा टॉप देखील वर उचलला जातो. त्यामुळे हा क्रॉप टॉप घातल्यावर काहीवेळा आपण अवघडल्यासारखे वावरतो. असे होऊ नये यासाठी क्रॉप टॉप घालताना एक सोपी ट्रिक नक्की वापरुन पाहा. virtualdiva.official या इंस्टाग्राम पेजवरुन क्रॉप टॉप घातल्यावर तो वर उचलला जाऊ नये यासाठी एक छोटीशी पण उपयोगी अशी टीप शेअर करण्यात आली आहे.
बॅकलेस ड्रेस घातला की ब्रेसियची पट्टी दिसते? २ सोप्या टिप्स- दिवाळी पार्टीसाठी करा खास लूक...
क्रॉप टॉप घातल्यावर हात वर घेतले की टॉप वर उचलला जाऊन पोट दिसू नये म्हणून आपण या एका ट्रिकचा वापर करु शकतो. यासाठी आपल्याला एक रबर बँड लागणार आहे. आपल्या क्रॉप टॉपचे खालचे सर्वात शेवटचे बटण उघडून त्यात हा रबर बँड अडकवून घ्यावा. त्यानंतर त्याच रबर बँडचे दुसरे टोक आपल्या जीन्सच्या बटणामध्ये अडकवून घ्यावे. त्यानंतर आपल्या जीन्सचे बटण लावून घ्यावे. आता आपल्या क्रॉप टॉपचे शेवटचे बटण आणि जीन्सचे बटण यात उभ्या पद्धतीने हा रबर बँड लागलेला असेल. त्यानंतर सगळ्यांत शेवटी आपल्या क्रॉप टॉपचे शेवटचे बटण लावून घ्यावे.
कंबरेत कधी सैल तर कधी घट्ट होते जीन्स? ३ ट्रिक्स, निवडा परफेक्ट जीन्स-मापात चूक नाही...
जीन्सचे बटण आणि क्रॉप टॉपचे शेवटचे बटण यांत एकत्रितपणे हा रबर बँड अडकून राहिल्याने, हात कितीहीवेळा वर केले तरी हा क्रॉप टॉप पोटाकडील भागातून वर उचलला जाणार नाही. अशाप्रकारे आपण क्रॉप टॉप सतत वर उचलला जाण्यापासून थांबवू शकतो. यामुळे क्रॉप टॉप घातल्यावर चारचौघात अवघडल्यासारखे देखील होणार नाही.