बऱ्याचदा पंजाबी ड्रेसवर किंवा लेहेंगा, घागरा यावर ओढणी कशी घ्यावी हे समजतच नाही. हल्ली तर असं असतं की ड्रेस खूप साधे, प्लेन किंवा बारीक डिझाईन असणारे असतात. पण त्यांच्यावरच्या ओढण्यांवर मात्र खूप हेवी आणि सुंदर वर्क केलेलं असतं. मग अशी ओढणी प्लेट्स घालून पिनअप करणं म्हणजे त्या ओढणीची सगळी शोभा घालवून टाकण्यासारखं वाटतं. म्हणूनच तर ओढणीचं सौंदर्य खुलून यावं, तिच्यावरचं काम पुर्णपणे दिसावं आणि नेहमीपेक्षा काहीतरी हटके स्टाईल केल्यासारखंही वाटावं, म्हणून ओढणी ड्रेपिंगची ही भन्नाट स्टाईल एकदा बघूनच घ्या.(How to wear dupatta as a jacket?)
या स्टाईलमध्ये आपण ओढणी अशा पद्धतीने पिनअप करणार आहोत की ती अगदी जॅकेट घातल्यासारखी दिसेल. इतक्या सुरेख पद्धतीने ओढणीचं ड्रेपिंग होतं की तिच्यावरची सगळी नक्षी, कलाकुसर अगदी स्पष्टपणे दिसून येते.
तसंही हल्ली जॅकेट असणाऱ्या पंजाबी ड्रेसची किंवा जॅकेट असणाऱ्या लेहेंग्याची फॅशन आहेच. मग असा ड्रेस विकत घेण्यात पैसे घालविण्यापेक्षा आपल्याकडे असलेल्या ओढणीचंच झटपट जॅकेट कसं तयार करायचं ते पाहून घ्या. हल्ली साड्यांवरही जॅकेट घालण्याची फॅशन आहे. एखाद्या प्लेन साडीवर तिला मिळती- जुळती ओढणी घेऊन तुम्ही 'साडी विथ जॅकेट' असाही लूक करू शकता.
कसं करायचं ओढणीचं जॅकेट?
ओढणीपासून जॅकेट तयार करण्यासाठी आपल्याला कोणत्याही टेलरची गरज नाही. किंवा अगदी सुई- दोरा हातात घेऊन शिवत बसण्याचीही गरज नाही. ओढणीचं झटपट जॅकेट करण्यासाठी फक्त एक पिन पुरेशी आहे.
१ हजार रुपयांत भरजरी साडी! लग्नसराईसाठी कमी पैशात सुंदर साडी घ्यायची तर हे ३ पर्याय एकदा बघाच
त्यासाठी ओढणीची दोन्ही बाजूची टोके ओढणीच्या मध्यापर्यंत दुमडून घ्या. दोन्ही टोके आणि ओढणीचा मध्यभाग यांना एक पिन लावून टाका. आता पिन जिथे लावली आहे, त्याच्या दोन्ही बाजूंनी बाह्यांप्रमाणे जागा दिसेल. तिथून दोन्ही हात घातले की तुमच्या ओढणीला जॅकेटप्रमाणे लूक येईल.