Join us  

साडी चापूनचोपून नेसण्यासाठी ५ सोप्या टिप्स, साडी नेसणं होईल सोपं - साडीचा बोंगा न होता दिसाल सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2023 2:28 PM

How to Wear a Saree ? Step-by-Step Guide to Draping A Saree Perfectly : साडी नेसणं हे अनेकींना अवघड काम वाटतं, मात्र सुंदर साडी झटपट नेसण्याच्या लक्षात ठेवा या ट्रिक्स...

आपला भारतीय पारंपरिक पोशाख म्हणून साडीकडे पाहिले जाते. एखाद्या भारतीय स्त्रीचे सौंदर्य हे साडीतच खुलून दिसते असे म्हटले जाते. साडी हे भारतीय महिलांचे मुख्य वस्त्र आहे, असे मानले जाते. बहुतेक स्त्रिया कोणत्याही खास प्रसंगी साडी नेसणेच पसंत करतात. आपल्यापैकी बहुतेक महिलांना साडी नेसणे अगदी मनापासून आवडते, परंतु फार कमी जणींना ती व्यवस्थित चापून - चोपून नेसता येते. याचबरोबर काही महिलांना पहिल्यांदाच साडी नेसताना, किंवा रोज साडी नेसण्याची सवय नसल्यामुळे (How To Wear Saree Easily ?) अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अशा परिस्थितीत अनेक वेळा इच्छा नसतानाही साडी नेसण्याचा प्लॅन रद्द करावा लागतो. त्यामुळे पहिल्यांदाच साडी नेसण्यापूर्वी काही गोष्टींकडे लक्ष देणे आवश्यक असते. 

पहिल्यांदा साडी नेसताना, साडीचे फॅब्रिक आणि वजन, प्लीट्स बनवणे आणि पदर हाताळण्यापर्यंत अनेक समस्या महिलांना येतात. पण काही सोप्या टिप्स फॉलो करून आपण काही मिनिटांत अगदी सहज साडी कॅरी करू शकता आणि परफेक्ट लूकमध्ये दिसू शकता. जर आपण पहिल्यांदाच साडी नेसणार असाल किंवा साडी व्यवस्थित नेसण्याची प्रॅक्टिस करत असाल तर या टिप्स फायदेशीर ठरतील(How To Wear Saree Easily ? Beautiful Saree Drape In simple Step).

साडी झटपट नेसता यावी यासाठी काही खास टिप्स... 

१. हलक्या वजनाची साडी निवडा :- पहिल्यांदाच साडी नेसताना (Saree Drape In simple Step) हलकी साडी निवडणे आवश्यक आहे. साधारणपणे काही स्त्रिया पहिल्यांदाच साडी नेसण्यासाठी कांजीवरम किंवा बनारसी सारख्या भारी साड्या निवडतात. अशा साड्यांना हाताळणे व नेसणे थोडे कठीण असते. तसेच, या साड्या पहिल्यांदाच नेसल्याने आपल्याला सवय नसल्यामुळे अस्वस्थ वाटू शकते. त्यामुळे पहिल्यांदाच साडी नेसताना जॉर्जेट, शिफॉन किंवा कॉटनची हलकी साडी निवडणे योग्य ठरेल.

महागड्या सिक्विन साडीची काळजी घेण्याच्या ६ टिप्स, नाहीतर चमचमती साडी पडेल काळी...

२. साडीच्या प्लीट्स बनवणे :- साडी नेसताना प्लीट्स बनवणे सर्वात अवघड वाटत असल्यास प्री-प्लेट्सचा पर्याय आपण निवडू शकता. त्यामुळे अशावेळी  साडीला आधीच प्लीट करू शकता. अशाप्रकारे आपल्याला साडी नेसणे खूप सोपे जाईल आणि आपण काही मिनिटांतच व्यवस्थित साडी नेसू शकाल. एवढेच नाही तर प्री-प्लेट्स केल्याने साडीत आपला लूकही परफेक्ट दिसेल.

‘बाईपण’ अवघड ? - जया आणि साधनासारखाच संकोच वाटतो ? योग्य मापाची ब्रेसियर कशी निवडायची हेच माहिती नाही ?

३. साडीला पिन केल्याची खात्री करा :- साडी हाताळण्यासाठी आणि परफेक्ट दिसण्यासाठी ती व्यवस्थित पिन करणे आवश्यक असते. यासाठी, प्लीट्स तसेच पदर पिन करण्यास विसरू नका. यामुळे आपल्याला साडी हाताळणे सोपे जाईल आणि प्लीट्स उघडण्याची भीती राहणार नाही. यासोबतच साडीला पिन केल्याने आपला लूकही अतिशय व्यवस्थित दिसेल.

"हाय हिल ते नाचे तो तू बड़ी जचे," पण हाय हिल्स घालून पस्तावाल? रोज हिल्स घालत असाल तर...

४. हेव्ही ब्लाउज कॅरी करू नका :- जर आपण पहिल्यांदाच साडी नेसत असाल तर जास्त हेव्ही ब्लाउज कॅरी करू नका. आपल्याला हवे असल्यास, साडीमध्ये एक अनोखा लुक कॅरी करण्यासाठी आपण हलक्या वजनाच्या ब्लाउजचा वापर करू शकता. अशा परिस्थितीत शर्ट स्टाइल ब्लाउज, क्रॉप टॉप ब्लाउज किंवा स्पॅगेटी ब्लाउज निवडणे अधिक फायदेशीर ठरेल. 

माथापट्टी डोक्यावरुन सतत घरसते, भरजरी-स्टायलिश लूकचा पचका होतो? १ सोपी ट्रिक-माथापट्टी बसेल मस्त फिट...

५. पेटीकोटच्या फिटिंग आणि मॅचिंगकडे लक्ष द्या :- साडी नेसण्यापूर्वी पेटीकोटच्या फिटिंग आणि मॅचिंगकडेही लक्ष देणं गरजेचे असते. खरंतर, पहिल्यांदाच साडी नेसताना स्त्रिया कमी घेर असलेले पेटीकोट घालतात. त्यामुळे त्यांना चालण्यास त्रास होऊ शकतो. म्हणूनच पेटीकोटच्या फिटिंगकडे दुर्लक्ष करु नये.  यासोबतच साडीला मॅचिंग पेटीकोट निवडा, तो साडीला आकर्षक लूक देण्यास मदत करेल.

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्स