Lokmat Sakhi >Fashion > काठपदराची साडी नेसल्यावर वय जास्त दिसतं? ५ टिप्स- पारंपरिक साडीमध्ये दिसाल मॉडर्न- तरुण

काठपदराची साडी नेसल्यावर वय जास्त दिसतं? ५ टिप्स- पारंपरिक साडीमध्ये दिसाल मॉडर्न- तरुण

Important Saree Hacks: काठपदराची साडी नेसल्यावर आपण आहोत त्यापेक्षा जास्त वयाच्या दिसतो, असा अनुभव बऱ्याच जणींना येतो. म्हणूनच साडी नेसताना या काही टिप्स लक्षात ठेवा..(how to wear saree for getting modern and young look?)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 19, 2024 12:50 PM2024-10-19T12:50:18+5:302024-10-19T12:51:05+5:30

Important Saree Hacks: काठपदराची साडी नेसल्यावर आपण आहोत त्यापेक्षा जास्त वयाच्या दिसतो, असा अनुभव बऱ्याच जणींना येतो. म्हणूनच साडी नेसताना या काही टिप्स लक्षात ठेवा..(how to wear saree for getting modern and young look?)

how to wear saree for getting modern and young look, important saree hacks | काठपदराची साडी नेसल्यावर वय जास्त दिसतं? ५ टिप्स- पारंपरिक साडीमध्ये दिसाल मॉडर्न- तरुण

काठपदराची साडी नेसल्यावर वय जास्त दिसतं? ५ टिप्स- पारंपरिक साडीमध्ये दिसाल मॉडर्न- तरुण

Highlightsकाठपदराची साडी नेसताना काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच कमी वयाच्या दिसाल

आता दिवाळी जवळ आली आहे. त्यामुळे दिवाळीसाठी किंवा दिवाळीनंतर येणाऱ्या लग्नसराईसाठी बहुतांश महिला साडी नेसतातच. त्यातही छान ट्रॅडिशनल लूक पाहिजे असेल तर आपण काठपदराच्या साडीची निवड करतो. पण काठपदराची टिपिकल लूक देणारी साडी नेसली की आपण आहोत त्यापेक्षा जास्त वयाचे वाटतो, असं अनेक जणींना वाटतं. याचं कारण म्हणजे तुम्ही साडी नेसताना बारीकसारीक चुका करता. यामुळे मग तुमचा लूक बिघडतो आणि ती साडी जरा बेढब वाटू लागते. म्हणूनच काठपदराची साडी नेसताना काही छोट्या छोट्या गोष्टी लक्षात घ्या. यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा नक्कीच कमी वयाच्या दिसाल शिवाय तुम्हाला खूप छान माॅडर्न लूक मिळेल..(how to wear saree for getting modern and young look?)

 

साडीमध्ये कमी वयाचं आणि मॉडर्न दिसण्यासाठी टिप्स...

१. साडी नेसताना बहुसंख्य जणी एक चूक करतात ती म्हणजे साडी जरा जास्तच वर नेसतात. म्हणजेच साडी अगदी पोटाच्या वरपासून नेसतात. यामुळे तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त प्रौढ दिसतात. तुम्हाला तरुण लूक पाहिजे असेल तर पेटीकोट नाभीच्या आसपास येईल या पद्धतीने बांधा आणि मग साडी नेसा.

जुन्या ब्लाऊजला द्या नवा डिझायनर लूक! ४ स्वस्तात मस्त आयडिया- महागडं ब्लाऊज घेण्याची गरजच नाही

२. साडीच्या निऱ्या खूप बारीक घाला आणि त्या डाव्या बाजुला जास्त सरकू देऊ नका. असं केल्यास तुमचा लूक पुर्णपणे बिघडतो. त्यामुळे नाभीच्या रेषेत अगदी मधोमध निऱ्या खोचल्या गेल्या पाहिजेत. 

३. साडी खूप उंच नेसू नका. साडीच्या खालच्या काठाचे खालचे टोक जमिनीवर अलगद टेकलेले असावे, यापद्धतीने साडीची उंची ठेवावी. 

 

४. पदराच्या प्लेट्सही खूप लहान घ्या आणि त्या तंतोतंत एकमेकांना जोडलेल्या असू द्या. मोठ्या प्लेट्स घेतल्या तर नक्कीच तुम्ही आहात त्यापेक्षा जास्त वयाच्या दिसाल.

फ्रिजमध्ये ठेवलेल्या कणकेच्या पोळ्या वातड- काळपट होतात ३ टिप्स- पोळ्या होतील मऊ, टम्म फुगलेल्या

तसेच पदर घेतल्यानंतर आतल्या बाजुचा जो पदर असेल तो पदराच्या इतर प्लेट्समध्ये झाकला जाऊ देऊ नका. व्यवस्थित पिनअप करून तो ठसठशीत दिसू द्या. यामुळेही तुमचा लूक बदलण्यास खूप मदत होईल.

५. निऱ्यांचा शेवट जिथे होतो तिथे म्हणजेच कंबरेच्या डाव्या बाजुने साडीचा काठ तिरक्या रेषेत दिसू द्या. अशा काही टिप्स फॉलो केल्या तर नक्कीच तुम्ही खूप माॅडर्न, तरुण आणि आकर्षक दिसाल. 

 

Web Title: how to wear saree for getting modern and young look, important saree hacks

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.