Join us  

सावळ्या रंगावर सूट होतील असे ४ रंग, लग्नाकार्यासाठी साडी निवडताना लक्षात ठेवा खास टिप्स...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2023 1:26 PM

If you have dusky skin tone know how to choose saree shade : सावळ्या रंगाला पूरक असे काही रंग असतात, ते योग्य पद्धतीने कॅरी केले तर आपण नक्कीच आकर्षक दिसू शकतो.

गोरा रंग म्हणजेच तुम्ही दिसायला सुंदर असे समीकरण आपल्याकडे आजही दिसते. पण सावळ्या रंगाच्या तरुणी, महिलाही नाकी-डोळी सुंदर असतात. सावळा रंग असणाऱ्यांनाही त्यांच्या स्वत:च्या रंगाबद्दल कॉम्प्लेक्स असल्याने कपड्यांची निवड करताना नेमके कोणते रंग आपल्यावर खुलून येतील याचा अंदाज त्यांना येत नाही. लग्नसराई सुरू झाली असून आपल्या कुटुंबात किंवा मित्रमंडळींमध्ये कोणाचे लग्न असेल तर आपण आवर्जून साडी नेसायचा प्लॅन करतो. अशावेळी आपण सगळ्यांमध्ये उठून दिसावे अशी आपली साहजिकच इच्छा असते. मग आपल्या रंगाला सूट होईल अशी साडी निवडण्यापासून सुरुवात असते (If you have dusky skin tone know how to choose saree shade). 

आपला रंग गोरा असेल तर आपल्यावर गडद रंगाची कोणतीही साडी सहज उठून दिसू शकते. पण आपला स्कीन टोन थोडा सावळ्या रंगाकडे जाणारा असेल तर आपल्याला साडीच्या रंगाची निवड करताना विशेष लक्ष द्यावे लागते. सावळ्या रंगावर कोणते रंग खुलून दिसतील याबाबत तुमच्या मनात संभ्रम असेल तर आज आपण असे काही रंग समजून घेणार आहोत जे घातल्यावर तुमचा स्कीन टोन सावळा असूनही तुमचे सौंदर्य खुलण्यास मदत होईल. सावळ्या रंगाला पूरक असे काही रंग असतात, ते योग्य पद्धतीने कॅरी केले तर आपण नक्कीच आकर्षक दिसू शकतो. पाहूयात अशीच काही कॉम्बिनेशन्स...

१. पिवळा

हळदीसारखा पिवळा रंग सावळ्या स्कीनवर छान उठून दिसतो. या रंगामुळे तुमचा चेहरा उठून दिसण्यास मदत होते. 

२. लाल 

भडक लाल नाही पण गुलाबी रंगाकडे जाणारा लालसर रंग सावळ्या रंगावर खुलतो. या रंगाचे चेहऱ्यावर चांगल्या प्रकारे रिफ्लेक्शन येत असल्याने हा रंग तुम्ही नक्की ट्राय करु शकता. 

३. केशरी

एकदम भडक केशरी किंवा नारंगी नाही तर गाजरी रंगाकडे जाणारा केशरी रंग सावळ्या रंगावर खुलून येऊ शकतो. अशाप्रकारची साडी तुमच्याकडे अवश्य असायला हवी. 

४. पिच

पिच रंग हा साधारणपणे कोणत्याही रंगावर खुलून दिसणारा रंग आहे. तुम्ही जर सावळ्या रंगाचे असाल तर हा पिच रंग फ्रेश असल्याने तो छान उठून दिसण्यास मदत होते.  

टॅग्स :फॅशनसाडी नेसणे