Join us  

International Women's Day 2022 : महिला दिनाला ऑफिसला जाताना ट्राय करा कॅज्युअल, मॉर्डन लूक; या घ्या सोप्या स्टायलिंग टिप्स

By ऑनलाइन लोकमत | Published: March 06, 2022 12:59 PM

International Women's Day 2022 नेहमीप्रमाणे ड्रेसअप न करता या दिवशी काहीतरी वेगळं, खास ड्रेसिंग करून ऑफिसला किंवा बाहेर जावं असं प्रत्येक महिलाला वाटतं. पण नेमकं काय करता येईल  हे सुचत नाही.  

आंतरराष्ट्रीय महिला दिन (International Women's Day 2022) हा प्रत्येक स्त्रीच्या सन्मासाठी तिच्या अस्तित्वासाठी खास दिवस असतो. नेहमीप्रमाणे ड्रेसअप न करता या दिवशी काहीतरी वेगळं, खास ड्रेसिंग करून ऑफिसला किंवा बाहेर जावं असं प्रत्येक महिलाला वाटतं. पण नेमकं काय करता येईल  हे सुचत नाही.  हा दिवस साजरा करण्यासाठी, तुम्ही स्वतंत्र महिलांच्या नेतृत्वाखालील असलेल्या कपड्यांच्या ब्रँडला तुमची मदत देऊ शकता आणि त्यांच्या व्यवसायाला पाठिंबा देऊ शकता किंवा समानतेचा प्रचार करणारा संदेश देणारे कपडे घालू शकता. (what to wear this womens day styling, dress tips for womens) महिला दिनासाठी काही ड्रेसिंग टिप्स तुम्हाला या लेखाच्या माध्यमातून देणार आहोत. 

१) स्कर्ट घालून ऑफिसला जाऊ शकता

मिडी स्कर्ट आणि मॅचिंग टॉपचा न्यू लूक तुम्ही महिला दिनाच्या दिवशी ट्राय करू शकता. कंबरेभोवती घट्ट बसणारे मिडी स्कर्ट मागच्या बाजूनं किंवा पायांच्या आजूबाजूला सैल असतात. म्हणून  स्कर्टची फिंटिंग व्यवस्थित असेल याची खात्री करा.  त्यावर साजेचे शूज किंवा सँडल्स निवडा.  अगदीच साधे सँडल्स किंवा चप्पल घालू नका. त्यामुळे तुमचा लूक उठून दिसणार नाही. 

२) सिंपल साडी बोट नेक ब्लाऊज

जर तुम्हाला सगळ्यात उठून आणि तितकंच सिंपल दिसायचं असेल तर तुम्ही महिला दिनाच्या दिवशी सिंपल वर्क असलेली साडी निवडू शकता तर तुम्ही बोट नेक ब्लाऊज वेअर केले तर गळ्यात जास्त काही घालावं लागणार नाही. फक्त मोठे  कानातले किंवा मिडीयम आकाराचे कानातले तुम्ही  ट्राय करू शकता. साधी सॅण्डल न घालता हिल्समध्ये चांगला पर्याय पाहा. हातात स्मार्ट वॉच किंवा एखादं छान ब्रेसलेट, कडा घातला तरी लूक मस्त दिसेल.

३) जांभळा रंग परिधान करा

सफ्रॅगिस्ट चळवळीशी संबंधित असलेल्या अनेक रंगांपैकी जांभळा रंग नक्कीच वेगळा आहे. 1908 मध्ये युनायटेड किंगडममधील महिला सामाजिक आणि राजकीय संघ (WSPU) पासून या रंगाची उत्पत्ती झाली, ज्याच्या ध्वजात जांभळा, पांढरा आणि हिरवा रंग आहे. जांभळा रंगा न्याय आणि सन्मान दर्शवितो; हिरवा आशेचे प्रतीक आहे; पांढरा शुद्धता दर्शवतो. तुमची स्त्रीवादी बाजू व्यक्त करण्यासाठी, या आंतरराष्ट्रीय महिला दिनी जांभळ्या रंगाची छटा घालणे निवडा. 

४) पांढरा रंग

पांढरी साडी परिधान केलेल्या गंगूबाई काठियावाडी या स्त्रीवादी चित्रपटात काम करणारी बॉलिवूड स्टार आलिया भट्टकडून प्रेरणा घेऊ शकता. संदेश देण्यासाठी पारंपारिक भारतीय लुक कसा परिधान केला जाऊ शकतो हे आलियाचे अलिकडील फोटो पाहून लक्षात येते.

५) फेमिनिस्ट टिशर्ट

2017 मध्ये, नेपाळी-अमेरिकन फॅशन डिझायनर प्रबल गुरुंग यांनी एका साध्या पांढऱ्या टी-शर्टवर "द फ्यूचर इज फिमेल" हे वाक्य छापले आणि त्यामुळे ते न्यूयॉर्क फॅशन वीकमध्ये फॅशन स्टेटमेंट बनले. बेला हदीद सारख्या मॉडेल्सनी रॅम्प वॉकसाठी टी-शर्ट परिधान केला होता आणि त्यामुळे तुम्ही या शतकभर चाललेल्या चळवळीशीसंबंधीत ड्रेसिंग करू शकता. म्हणजेच एखादं आवडतं वाक्य प्रिंट असलेलं टि शर्ट निवडा.

६) फेमिनिस्ट ज्वेलरी

महिलांच्या नेतृत्वाखालील इंडी ब्रँडने तयार केलेले दागिने घालून तुम्ही तुमची स्त्रीवादी बाजू व्यक्त करू शकता. हा फेम नेकलेस घाला जो तुमचा स्त्रीसौंदर्य व्यक्त करण्याचा मार्ग असू शकतो किंवा महिला दागिन्यांच्या डिझाइनरने डिझाइन केलेले चंकी हूप्स घाला.

टॅग्स :फॅशनखरेदीब्यूटी टिप्सप्रेरणादायक गोष्टी