अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाह सोहळा मोठ्या थाटामाटात पार पडला. या विवाह सोहळ्यात अंबानी कुटुंबीयांनी परिधान केलेल्या कपड्यांची शान काही औरच आहे. प्रत्येक विधीनुसार सगळ्यांनीचअतिशय रॉयल लूक देणारे असे कपडे निवडले होते. नीता अंबानी त्यांच्या साड्या, घागरे, दागिने यांची चर्चा झालीच. त्यांचा फॅशन सेन्सही कमालीचा उत्तम आहे.
कपडे असो किंवा दागिने, खास असतात. त्यांचा हाच गुण त्यांची लेक ईशा अंबानी (Isha Ambani) हिने देखील घेतला आहे. ईशा आईचे दागिनेही हौशीने घालते. शुभ आशीर्वाद समारंभात ईशाने घातलेल्या नेकलेस आणि कानातल्यांची सर्वत्र चर्चा आहे. ईशाचा नेकलेस केवळ दिसायलाच सुंदर नाही तर त्याची रचना आश्चर्यचकित करणारी आहे. हा नेकलेस बनवायला खूप वेळ लागला असल्याचे समजते(Isha Ambani's 'Navratan Haar' Took Three Years To Collect, She Wore Blue Sapphire For The First Time).
ईशाची अनोखी स्टाईल...
शुभ आशीर्वाद समारंभात ईशाने पांढरा सिल्क ब्रोकेड रंगाचा लेहेंगा घातला होता. तिचा हा पांढरा सिल्क ब्रोकेड लेहेंगा मनीष मल्होत्राने डिझाइन केला होता. या लुकसोबत तिने न्यूड मेकअप आणि मिडल पार्टेड हेअर स्टाइल केली' होती. या लूकमध्ये सर्वांचे लक्ष वेधून घेतलेली गोष्ट म्हणजे तिचे दागिने. ईशाने खूप सुंदर नेकलेस घातला होता. तसेच दोन वेगवेगळ्या रंगाचे कानातले घातले होते. त्यापैकी एक कानातले पांढऱ्या रंगाचे आणि एक हिरव्या रंगाचे असे होते.
ईशा अंबानीच्या या पांढऱ्या सिल्क ब्रोकेड लेहेंग्यात जरी आणि जरदोसीचे वर्क हे अस्सल शुद्ध चांदीने केले होते. त्यासोबत तिने थ्री - फोर्थ स्लीव्ह असणारा ब्रोकेड ब्लाउज घातला होता. ज्यावर सोनेरी रेशमी धाग्यांनी फुलांचे डिझाईन बनवले होते. विविध वृत्तांनुसार असे समजते की ईशाने घातलेल्या नेकलेसमधला हिरा शोधायला तब्बल तीन वर्ष लागली होती.
आलिया भटची लाल साडी ते दीपिका पादुकोणचा अनारकली, अंबानी लग्नसोहळ्यातला सुंदर साड्यांची पाहा झलक...
या नेकलेसला नायब नवरत्न असं म्हणतात. तर अमेरिकेतील प्रसिद्ध सोशल मीडिया इन्फ्लुएंझर ज्युलियाकडून मिळालेल्या माहितीनुसार, या नेकलेसमध्ये एक-दोन नव्हे तर एकूण ७ रत्न आहेत. ज्युलियाने तिच्या इन्स्टाग्राम पोस्टद्वारे नेकलेसची माहिती दिली आहे. लग्नाच्या वेळी नीता अंबानी यांनी स्वतः ज्युलियाला सांगितले की, ईशाच्या गळ्यात असणाऱ्या नेकल्सची रत्न गोळा करण्यासाठी तीन वर्षे लागली.