Join us

इशा गुप्ताचे बनारसी साडीतले देखणे फोटोशूट, बघा तिच्या सुंदर साड्यांवरची अनोखी नजाकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2023 14:20 IST

Isha Gupta's Beautiful Photo Shoot In Banaras:अभिनेत्री इशा गुप्ता हिचे बनारसी साडीतले काही फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत...

ठळक मुद्देगर्द लाल रंगाची साडी, त्यावर सोनेरी दागिने आणि हातभर लाल बांगड्या अशा थाटातली इशा एकदा बघायलाच हवी... 

स्टनिंग आणि स्टायलिश लूकसाठी अभिनेत्री इशा गुप्ता नेहमीच ओळखली जाते. आता देखील तिने सुंदर बनारसी साड्या नेसून बनारच्या घाटावर आणि तिथल्या काही भागांमध्ये सुंदर फोटोशूट केले असून तिचे ते फोटो सध्या सोशल मिडियावर चांगलेच गाजत आहेत. कामानिमित्त की सुट्टीनिमित्त इशा तिथे गेली हे माहिती नाही पण ती तिची बनारस ट्रिप खऱ्या अर्थाने एन्जॉय करत असून तिचे चाहतेही तिचे फोटो पाहून खुश झाले आहेत. (Isha Gupta's beautiful photo shoot in Banaras)

 

साधारण २ ते ३ दिवसांपुर्वी इशाने सोनेरी रंगातल्या बनारसी साडीमधले काही फोटो तिच्या इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. यामध्ये ती नावेमध्ये बसलेली दिसून आली. सोनेरी साडीवर सोनेरी झुमके, सुंदर पायातले, कपाळावर एक छोटीशी टिकली आणि लाईट शेडमधला ग्लॉसी मेकअप अशा थाटात इशा अगदी सुंदर दिसत होती. तिच्या ब्लाऊजचा गळा बंद आणि गोल होता. कधी तरी अशा पद्धतीचे ब्लाऊज शिवून पाहायलाही हरकत नाही.. "उस की याद आई है साँसो ज़रा आहिस्ता चलो धड़कनों से भी इबादत में ख़लल पड़ता है"अशी कॅप्शन तिने तिच्या फोटोंना दिली आहे. 

 

यानंतर आता पुन्हा एकदा इशाने तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती लाल रंगाच्या टिपिकल हेवी वर्क असलेल्या बनारसी साडीमध्ये दिसते आहे. "तुम्हारे शहर का मौसम बड़ा सुहाना लगे मैं एक शाम चुरा लूँ अगर बुरा न लगे.. ",असं कॅप्शन तिने या फोटोंना दिलं असून तिच्या साडीप्रमाणेच या कॅप्शनचीही चर्चा सोशल मिडियावर चांगलीच रंगली आहे. गर्द लाल रंगाची साडी, त्यावर सोनेरी दागिने आणि हातभर लाल बांगड्या अशा थाटातली इशा एकदा बघायलाच हवी... 

टॅग्स :फॅशनइशा गुप्तासाडी नेसणे