Join us  

हॅण्डलूम टिश्यू साडीवर सोन्याची जर! बघा मनीष मल्होत्राने जान्हवी कपूरसाठी डिझाईन केलेली सुंदर साडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2023 1:25 PM

Janhavi Kapoor's Handloom Saree Having Gold Zari: दसऱ्याच्या मुहुर्तावर अभिनेत्री जान्हवी कपूर हिने नेसलेली साडी लक्षवेधी ठरली. तुम्ही पाहिली का जान्हवीच्या त्या सुंदर साडीची झलक?

ठळक मुद्देबघा जान्हवीचा हा लूक आवडला असेल, तर दिवाळीला नक्की ट्राय करा...

स्टायलिश, ट्रेण्डी आणि स्टनिंग अभिनेत्री म्हणून सध्या जान्हवी कपूरकडे पाहिले जात आहे. तिचाही फॅशन सेन्स तिच्या आईसारखाच म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवी यांच्यासारखाच जबरदस्त कॅची आहे, असं जान्हवीच्या बाबतीत नेहमीच म्हटलं जातं. वेस्टर्न गाऊनमध्ये जान्हवी जेवढी हॉट- स्टायलिश दिसते, तेवढीच देखणी- सुंदर ती साडीमध्ये दिसते. आता हेच पाहा ना दसऱ्यासाठी जान्हवीने सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेली साडी नेसली होती (Handloom Tissue Saree Having Gold Zari). सोन्याची जर असलेली गुलाबी छटेतली ही हॅण्डलूम साडी जान्हवीच्या चाहत्यांना भारीच आवडली असून जान्हवीचे त्या साडीतले सुंदर फोटो सध्या साेशल मिडियावर चांगलेच व्हायरल आहेत. (Janhavi Kapoor's pink saree designed by celebrity designer Manish Malhotra)

 

जान्हवीचे काही फोटो मनिष मल्होत्रा यांनी इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. चमकदार गुलाबी किंवा डाळिंबी रंगाची ही साडी प्लेन आहे. पण साडीच्या काठांना मात्र सोनेरी जर असून त्यावर कुंदन, मोती आणि सेक्विन वर्क केलेलं आहे.

दिवाळीला राणी मुखर्जीसारखी गोल्डन साडी घ्यायची? १००० रुपयांत मिळतील सुंदर साड्या, बघा ३ खास पर्याय

मनिष मल्होत्रा यांनी antique gold zari-crusted borders असं या काठांचं वर्णन केलं आहे. तसेच या साडीचं खरं सौंदर्य खुललंय ते साडीवरच्या ब्लाऊजमुळे. कारण ब्लाऊज अतिशय भरगच्च असून त्यावर हेवी सेक्विन आणि मोती वर्क आहे. सध्या प्लेन साडी आणि हेवी वर्क असणारं ब्लाऊज असा ट्रेण्ड आहे. तुम्हालाही दिवाळीसाडी अशी काही खरेदी करायची असेल तर जान्हवीचा हा लूक नक्कीच तुमच्या उपयोगी येऊ शकतो.

 

या चमकदार साडीवर जान्हवीने मेकअपही ग्लॉसी पिंक शेडमधला केला आहे. केस समोरच्या बाजुने पिनअप करून मागे मोकळेच साेडले आहेत.

चित्रांगदा सिंगची ६४ हजारांची पांढरी ऑर्गेंझा साडी! बघा साडीची नजाकत, दिवाळीत ऑर्गेंझा साडी घ्यायची तर...

तसेच गळ्यात मोती आणि खडे जडवलेलं गळ्यातलं आणि त्याला मॅचिंग कानातले घातले आहेत. हातात फक्त एक अंगठी आहे. साडीचे काठ आणि ब्लाऊज भरजरी असल्याने त्यावर खूप मेकअप करण्याची आणि हेवी दागिने घालण्याची गरज नाही. बघा जान्हवीचा हा लूक आवडला असेल, तर दिवाळीला नक्की ट्राय करा... 

टॅग्स :फॅशनजान्हवी कपूरमनीष मल्होत्रासाडी नेसणे