Join us

जान्हवी कपूरच्या मागे रॅम्प वॉक करणाऱ्या ‘त्या’ देखण्या डौलदार तरुणीचीच चर्चा, कोण ती, केलं काय?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2025 18:19 IST

Lakme Fashion Week 2025: शो स्टॉपर असूनही जान्हवी कपूर ट्रोल झाली आणि त्याचवेळी तिच्या मागे चालणारी माॅडेल तमन्ना कटोच मात्र खूप हिट झाली...

ठळक मुद्देतिचे हावभाव, चाल आणि चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास यामुळे ती सोशल मीडियावर सध्या खूप कौतुकाचा विषय ठरली आहे. 

लॅक्मे फॅशन वीक हा फॅशन जगतातला अतिशय महत्त्वाचा सोहळा असतो. या सोहळ्यात सहभागी होण्याची स्वप्नं अनेक मॉडेल्स पाहतात.. कोणाकोणाच्या बाबतीत या संधीचं अक्षरश: सोनं होऊन जातं आणि त्यांचं मॉडेलिंग करिअर नवं वळण घेतं. सध्या चर्चेत असणाऱ्या तमन्ना कटोच या मॉडेलच्या बाबतीतही असंच काहीसं होत आहे, असं म्हणायला हरकत नाही. कारण Lakme Fashion Week दरम्यान आयोजित एका सोहळ्यात जान्हवी कपूर ही शो स्टॉपर होती. आणि तिच्या अगदी मागे तमन्ना कटोच होती. जान्हवीने एखाद्या स्टारप्रमाणे अतिशय आत्मविश्वासाने एन्ट्री घेतली. पण तिच्यापेक्षाही जास्त उठून दिसली ती तिच्या मागे चालत येणारी तमन्ना.. तमन्नामध्ये जान्हवीच्या तुलनेत खूप उत्तम मॉडेलिंग स्किल्स आहेत. त्यामुळे ती रॅम्पवॉक आणि एकंदरीतच स्टेजवरच्या प्रेझेंन्सच्या बाबतीत जान्हवीपेक्षाही सरस ठरली आणि भाव खाऊन गेली अशी चर्चा सध्या तमन्नाच्या बाबतीत होत आहे..(Viral Video Of Janhavi Kapoor And Tamanna Katoch Ramp Walk)

 

कोण आहे तमन्ना कटोच?

तमन्ना कटोच ही एक सुपर मॉडेल असून ती मुळची दिल्लीची आहे. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण घेतलेली तमन्ना महाविद्यालयात असल्यापासूनच मॉडेलिंग करते आहे.

साडी नेसल्यावर वयस्कर दिसता? ब्लाऊजचा पुढचा गळा शिवताना 'या' चुका टाळा- दिसाल स्मार्ट, आकर्षक

India's Next Top Model च्या सिझन ४ मध्येही तमन्ना दिसली होती आणि तिथेही तिने अनेकांची मनं जिंकून घेतली होती. मनिष मल्होत्रा, अंकिता जैन, फाल्गुनी शेन पिकॉक, सुलक्षणा मोंगा यांच्यासारख्या बड्या डिझायनर्ससोबत तिने आतापर्यंत काम केलेलं असून ती बऱ्याच मोठमोठ्या ब्रॅण्ड हाऊसच्या कार्यक्रमांमध्येही दिसून आली आहे. 

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1044214434435083/}}}}

 

तमन्ना कटोच हे माॅडेलिंग जगतातलं एक प्रसिद्ध नाव असून तिचे सोशल मिडियावरही लाखो फॉलोअर्स आहेत. यावरूनच तिची लोकप्रियता दिसून येते.

हिमाेग्लोबिन नेहमीच कमी असतं? डाॅक्टर सांगतात ४ पदार्थ खा- औषधं घेण्याची वेळच येणार नाही

तमन्नाच्या बाबतीत आणखी एक अशी खासियत सांगितली जाते की ती इंडियन तसेच वेस्टर्न या दोन्ही प्रकारचे आऊटफिट्स खूप उत्तम पद्धतीने कॅरी करू शकते. तिचे हावभाव, चाल आणि चेहऱ्यावर झळकणारा आत्मविश्वास यामुळे ती सोशल मीडियावर सध्या खूप कौतुकाचा विषय ठरली आहे. 

 

टॅग्स :फॅशनस्टायलिंग टिप्सलॅक्मे फॅशन वीकजान्हवी कपूर