Lokmat Sakhi >Fashion > सूट 'सूट' करदा!करीना कपूरचा २२ हजारांचा पंजाबी सूट, पारंपरिक ड्रेसची खास बात..

सूट 'सूट' करदा!करीना कपूरचा २२ हजारांचा पंजाबी सूट, पारंपरिक ड्रेसची खास बात..

Kareena Kapoor in Rs 22k Panjabi Suit : पाहा बेबोचा एथनिक लूक, काय आहे ड्रेसची खासियत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2022 05:55 PM2022-08-22T17:55:44+5:302022-08-22T18:00:27+5:30

Kareena Kapoor in Rs 22k Panjabi Suit : पाहा बेबोचा एथनिक लूक, काय आहे ड्रेसची खासियत...

Kareena Kapoor in Rs 22k Panjabi Suit : Suit 'Suit' Karda! Kareena Kapoor's 22 thousand Punjabi suit, the special thing about traditional dress.. | सूट 'सूट' करदा!करीना कपूरचा २२ हजारांचा पंजाबी सूट, पारंपरिक ड्रेसची खास बात..

सूट 'सूट' करदा!करीना कपूरचा २२ हजारांचा पंजाबी सूट, पारंपरिक ड्रेसची खास बात..

Highlightsलेबल बेगमच्या बेवसाइटवर हा ड्रेस २२,८०० रुपयांना उपलब्ध असून तुम्हालाही हा ड्रेस आवडला असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करु शकता. कुर्ता, पँट आणि शीर दुपट्टा असा हा पंजाबी सूट फारसा हेवी नसूनही इतका महाग का असा प्रश्न आपल्याला पडतो.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री करीना कपूर कायमच चर्चेत असते. कधी तिच्या फिगरमुळे तर कधी फिटनेसमुळे, कधी फॅशन सेन्समुळे तर कधी तिची मुलं तौमूर आणि जेह, नवरा सैफ अली खान यांच्यामुळे तिच्याबाबत सोशल मीडियात आणि तिच्या चाहत्यांमध्ये चांगलीच चर्चा रंगलेली दिसते. करीना सोशल मीडियावरही कायम अपडेट असते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती चाहत्यांना आपल्या आयुष्यातील अपडेटस द्यायचा प्रयत्न करत असते. करीनाचा फॅशन सेन्स आणि ती ते कॅरी करताना किती सहजतेने करते हे आपण अनेकदा पाहतो. बेबो वेस्टर्न लूकमध्ये जितकी सुंदर दिसते तितकीच ती पारंपरिक कपड्यांतही खुलून येते (Kareena Kapoor in Rs 22k Panjabi Suit). 

नुकताच तिचा एक फोटो व्हायरल झाला असून तिच्या ड्रेसवर बरीच चर्चा सुरू आहे. पिस्ता रंगाच्या ड्रेसमध्ये बेबो अतिशय सुंदर दिसत असून त्यावर तिने मोठे सिल्व्हर झुमके आणि काळ्या रंगाचा गॉगल घातलेला आहे. याशिवाय करीनाने फारसे दागिने घातलेले किंवा खूप मेकअप केलेला दिसत नाही. तर तिने कपाळावर एक गोल साधी टिकली लावल्याने तिच्या सौंदर्यात आणखीनच भर पडली आहे. बेबोने केसांचा नेहमीप्रमाणे घट्ट आंबाडा बांधला असल्याने ती सुंदर दिसत आहे. व्हि नेक असलेल्या या पंजाबी ड्रेसला एक अतिशय नाजूक अशी लेस लावण्यात आली आहे. ड्रेसच्या बाह्या फुल असून हा ड्रेस करीनाला थोडा ढगळा होत असल्याचे दिसते. 

(Image : Google)
(Image : Google)

ड्रेसवर करीनाने ड्रेसला मॅचिंग असलेली डिझायनर ओढणी घेतली असून त्यामुळे तिचा लूक आणखीनच खुलून आला आहे. यातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे, या ड्रेसची किंमत. ही किंमत थोडीतोडकी नसून तब्बल २२ हजार रुपये आहे. आता ड्रेसची किंमत इतकी जास्त असण्यामागे नेमकं कारण काय असा प्रश्न आपल्याला साहजिकच पडला असेल. कुर्ता, पँट आणि शीर दुपट्टा असा हा पंजाबी सूट फारसा हेवी नसूनही इतका महाग का असा प्रश्न आपल्याला पडल्यावाचून राहणार नाही. दोऱ्याची आणि सिक्विन एम्ब्रॉडरी असल्याने या पंजाबी सूटची किंमत जास्त आहे. यावर करीनाने सिंपल अशी जुती घातली असून रक्षाबंधनासाठी तिनी हा खास लूक केला होता. लेबल बेगमच्या बेवसाइटवर हा ड्रेस २२,८०० रुपयांना उपलब्ध असून तुम्हालाही हा ड्रेस आवडला असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करु शकता. 

Web Title: Kareena Kapoor in Rs 22k Panjabi Suit : Suit 'Suit' Karda! Kareena Kapoor's 22 thousand Punjabi suit, the special thing about traditional dress..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.