नव्या वर्षाची सुरुवात असो, दिवाळी असो, ख्रिसमस असो किंवा मग राखीपौर्णिमा आणि गणेशोत्सव असो.. कपूर परिवारातील सगळे सदस्य वेगवेगळ्या सणांच्या निमित्ताने एकत्र येतात आणि एकत्रितपणे प्रत्येक उत्सवाचा आनंद साजरा करतात. बाॅलीवूडमध्ये इतरही अनेक परिवार आहेत. पण अशा पद्धतीचा फॅम- जॅम मात्र कपूर कुटूंबातच दिसून येतो. कपूर कुटूंबियांनी नुकताच एकत्र येऊन गणेशोत्सव साजरा केला. यावेळी तिथे जमलेले सगळेच जण खूप सुंदर कपड्यांमध्ये होते. पण तरीही करिना आणि करिश्मा या दोघींनी मात्र लक्ष वेधून घेतले. त्या दोघींचाही लूक अतिशय सिंपल पण तेवढाच आकर्षक होता. (Beautiful Dressing by Kareena And Karisma Kapoor)
गणेशोत्सवासाठी करिना कपूरने पिवळ्या रंगाचा सलवार- कुर्ता घातला होता. चमकदार सोनेरी ड्रेसवर तिने अंबाडा घातला होता आणि मोजकेच दागिने घालून कपाळावर मोठी टिकली लावली होती.
गणपती विसर्जनाच्या नैवेद्यात शेवयाची खीर हवीच! परफेक्ट खिरीसाठी ५ टिप्स- खीर गचका होणार नाही
तिचा हा सिल्क कुर्ता अनामिका खन्ना यांच्या कलेक्शनमधला होता आणि त्याची किंमत ब्रॅण्डच्या ऑनलाईन शाॅपिंग साईटवर तब्बल ४० हजार एवढी दाखविण्यात आली आहे. त्या ड्रेसच्या गळ्याभोवती तसेच दोन्ही बाजुला असणाऱ्या कटवर लाल रंगाने सुंदर हॅण्ड एम्ब्रॉयडरी करण्यात आली आहे.
यावेळी करिश्मा कपूरने जो ड्रेस घातला होता तो देखील अतिशय आकर्षक होता. सर्वसामान्यांसाठी तो ड्रेसही खूप महाग आहे. पण तिच्या सख्ख्या बहिणीने म्हणजेच करिनाने घातलेल्या ड्रेसपेक्षा तो खूपच कमी किमतीचा आहे.
डाएटिशियन सांगतात नाश्त्यामध्ये ४ पदार्थ मुळीच खाऊ नये- वजन आणि शुगर भराभर वाढेल
करिश्माचा ड्रेस ९ हजार रुपयांचा असून तो Gulabo Jaipur या फॅशन हाऊसचा आहे. करिश्माचा ड्रेस कॉटनचा असून तो अनारकली प्रकारातला असून त्यावरची ओढणी डोरीया दुपट्टा या प्रकारातली आहे. दोघी बहिणींचे ड्रेस आणि त्यांचे लूक फेस्टिव्ह सिझनला अगदी परफेक्ट मॅच होणारे आहेत.