दादासाहेब फाळके आंतरराष्ट्रीय पुरस्कार सोहळा (2024 Dadasaheb Phalke International Film Festival Awards) नुकताच मुंबई येथे मोठ्या थाटामाटात पार पडला. या सोहळ्यासाठी बॉलीवूडचे अनेक नामवंत कलाकार उपस्थित होते. यामध्ये प्रत्येकाचीच ड्रेसिंग आणि खासकरून अभिनेत्रींचे स्टायलिश लूक खरोखरच बघण्यासारखे होते. पण त्या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त भाव खाऊन गेली ती बेबाे करिना कपूर (Kareena Kapoor). या सोहळ्यासाठी करिना कपूरने अबू जानी संदिप खोसला यांच्या कलेक्शनमधला गोल्डन पेस्टल रंगाचा अनारकली ड्रेस घातला होता. चमचमत्या आरशांचं भरपूर वर्क असणारी करिना जेव्हा त्या सोहळ्यात अवतरली, तेव्हा नकळतच सगळ्यांच्या नजरा आणि कॅमेरे तिच्याकडे फिरले असणार... (Kareena Kapoor's anarkali dress is having more than 1 lakh mirror)
करिना कपूरच्या अनारकली ड्रेसची खासियत
करिना कपूरने जो ड्रेस घातला होता तो जवळपास ६० कळ्या असणारा अतिशय घेरदार अनारकली होता. या ड्रेसवर लहान- लहान गोलाकार असे तब्बल १ लाखांपेक्षाही जास्त आरसे लावलेले होते.
फक्त सेफ्टी पिन, सुई वापरून कंगवा स्वच्छ होत नाही, बघा कंगवा कसा आणि कधी स्वच्छ करावा
विशेष म्हणजे हे सगळे आरसे हाताने लावलेले होते. त्यासाठी कोणतंही मशिनवर्क करण्यात आलेलं नव्हतं आणि त्यासाठी जवळपास १०० विणकरांनी कित्येक तास मेहनत घेतली होती. तिच्या त्या ड्रेसची नेकलाईन डीप व्ही या प्रकारातली होती. तसेच ड्रेसच्या बाह्या थ्री- फोर्थ प्रकारातल्या होत्या.
या चमचमत्या ड्रेसवर करिनाने गोल्डन शेड असणारा शिमरी मेकअप केला होता. पण लिपस्टिक आणि डोळ्यांचा मेकअप मात्र मॅट फिनिशिंग असणारा होता.
लसूण महागला, त्याची टरफलंही वापरा- पावडर करा आणि स्वयंपाकात घाला, बघा स्पेशल रेसिपी
हिरवे खडे असणारं सोनेरी नेकलेस आणि हातातली टपोरी अंगठी लक्षवेधी तर ठरलीच, पण तिच्या मेकअपला, अनारकलीला एक कम्प्लिट लूक देणारी होती. तसेच करिनाची या ड्रेसवरची ओढणी ऑर्गेंजा सिल्कची होती आणि तिच्यावरही भरपूर मिरर वर्क करण्यात आलं होतं. दोन्ही हातांच्या कोपऱ्यावरून पुढे सोडून करिनाने ती अतिशय स्टायलिश पद्धतीने कॅरी केली होती.