बॉलीवूडमध्ये ती खूप काही ॲक्टीव्ह नाही. तिचे चित्रपट तर आता जवळपास नाहीतच. पण तरीही तिची क्रेझ मात्र अजूनही कमी झालेली नाही. 'बस्स नाम ही काफी है...', असं जे काही म्हणतात ते करिश्मा कपूरच्या बाबतीत अगदी तंतोतंत जुळतं. म्हणूनच तर सोशल मिडियावर करिश्माच्या फॉलोव्हर्सची संख्या दिवसेंदिवस वाढतेच आहे. आता पुन्हा एकदा तिच्या लोकप्रियतेचा आणि तिच्या सौंदर्याचा अंदाज नव्याने आला. त्याला कारण म्हणजे तिने नुकतेच तिच्या गडद गुलाबी रंगातल्या साडीतले काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून हे फोटो सध्या खूपच व्हायरल (viral photos of Karisma Kapoor) झाले आहेत. साडीलव्हर्स ग्रुपमध्ये तर तिच्या या ७० हजारांच्या बनारसी साडीची चांगलीच चर्चा आहे. (Karisma Kapoor's Banarasi Silk Saree Worth Rs. 70K)
करिश्मा कपूरच्या बनारसी साडीची खासियतकरिश्माच्या ट्रॅडिशनल ड्रेसिंग सेन्सचं नेहमीच कौतूक केलं जातं. लेहेंगा, पंजाबी ड्रेस किंवा मग साडी असे कोणतेही भारतीय पोषाख ती खूप छान पद्धतीने कॅरी करते. त्यामुळे तिच्या स्टाईलची, फॅशनची नेहमीच चर्चा होत असते.
काठापदराची महागडी साडी फाटली? घाबरू नका, करा १ सोपा उपाय- साडी फाटली होती हे लक्षातही येणार नाही
आता करिश्माने जे फोटो साेशल मिडियावर शेअर केले आहेत, त्यात तिने सेलिब्रिटी डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कलेक्शनमधली गडद गुलाबी रंगाची ज्याला आपण राणी कलर म्हणतो, अशी सुंदर साडी नेसली आहे. गुल म्हणून ही साडी ओळखली जाते. या साडीची खासियत अशी की या साडीच्या काठांना गोटापट्टी वर्क केलेलं असून त्यावर सिक्विन वर्क आहे.
सामान्यपणे सिक्विन वर्क हे डिझायनर प्रकारातल्या साड्यांवर केलं जातं. पण करिश्माच्या बनारसी साडीवर खूप सुंदर सिक्विन वर्क दिसत असून त्यामुळे साडीचे साैंदर्य आणखीनच वाढले आहे.
झाडं भराभर वाढतात पण फुलंच येत नाहीत? स्वयंपाक घरातले ५ पदार्थ वापरा- बागेत पडेल फुलांचा सडा....
त्यामुळे 'ट्रॅडिशनल विथ मॉडर्न' अशा प्रकारची ही साडी विणणाऱ्या विणकरांचेही खूप कौतूक होत आहे. या साडीवर करिश्माने स्लिव्हलेस ब्लाऊज घातले असून केसांचा मानेवर एक साधा पोनीटेल बांधला आहे. कानात मोठे झुमके, हातात बांगडी आणि ग्लॉसी मेकअप अशा लूकमधली करिश्मा अतिशय देखणी दिसत आहे.