बॉलीवूड अभिनेत्री एरवी वेस्टर्न कपड्यांमध्ये वावरत असल्या तरी काही खास प्रसंगी पारंपरिक भारतीय पेहराव करणे आणि त्यातल्या त्यात साडी नेसणे, याला बहुतांश जणी अधिक प्राधान्य देतात. म्हणूनच तर आजकाल चित्रपटांच्या प्रमोशनल कार्यक्रमांनाही अनेक जणी साडी नेसूनच जातात. अभिनेत्री करिश्मा कपूरही साडी लव्हर (saree lover) आहे. वेगवेगळ्या पद्धतीच्या साड्या मोठ्या खुबीने कॅरी करणे, ही तिची खासियत. त्यामुळे तिचे साडी लूक आणि साड्यांची चॉईस याची नेहमीच चर्चा रंगत असते. आता सध्यादेखील तिचे ऑर्गेंझा साडीमधले (Karisma Kapoor's organza saree worth Rs. 20K) काही फोटो व्हायरल झाले आहेत.
कशी आहे करिश्माची साडी?
या फोटोमध्ये करिश्माने जी साडी नेसली आहे ती viscose blend and silk organza अशा मिक्स मटेरियलची असून त्यावर पानाफुलांचं जे डिझाईन आहे ते डिजिटल प्रिंट प्रकारातलं आहे. बॉटल ग्रीन, पांढरा आणि काही ठिकाणी
पहा गंमत! दारासमोर काढली क्यू आर कोड रांगोळी, स्कॅन करताच मोबाईलवर दिसले..... बघा व्हायरल व्हिडिओ
काळपट शेड असणारी ही साडी फॅशन डिझायनर पायल खांडवाला यांच्या वेडिंग कलेक्शनमधली आहे. या साडीवर करिश्माने नेकलेस डिझाईन प्रकारातलं बंद गळ्याचं ब्लाऊज घातलं आहे. पायल खांडवाला यांच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर साडीची किंमत १९, ८०० रुपये एवढी सांगण्यात आली आहे.
साडीवरचे दागिनेही आहेत खास
वजनाला अतिशय हलक्या आणि मऊ- तलम सूत असणाऱ्या या साडीवर करिश्माने ऑक्सिडाईज दागिने घातले आहेत. कानात घातलेले मोठे झुमके, हातातली बांगडी आणि ठसठशीत डिझाईन असणारी अंगठी हे सगळं अभिलाषा
थंडीच्या दिवसांत पौष्टिक ठरणारे ३ सुपरफूड, ते पदार्थ कोणते आणि कसे खायचे? वाचा तज्ज्ञांचा सल्ला
ज्वेलरी कलेक्शन या ब्रॅण्डचं आहे. या ब्रॅण्डच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर झुमक्यांची किंमत ८, ४०० रुपये तर बांगडीची किंमत ८, ९०० रुपये दाखवण्यात आली आहे.