Join us  

करिश्मा कपूरचा सुपरकुल मिडी ड्रेस, थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी ठरू शकतो परफेक्ट... बघा ड्रेसची किंमत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2022 3:53 PM

Karisma Kapoor's midi dress: थर्टीफर्स्टच्या पार्टीसाठी कसा लूक करायचा? याचा विचार करत असाल तर अभिनेत्री करिश्मा कपूरने घातलेला हा सुपरकुल मिडी ड्रेस त्यासाठी एक चांगला पर्याय ठरू शकतो.

ठळक मुद्देतिच्या या ड्रेसची किंमतही खूप जास्त नाही. त्यामुळे थर्टीफर्स्ट पार्टीसाठी ड्रेसिंग आणि लूक कसा करावा असा विचार करत असाल, तर करिश्माचे हे स्टनिंग फोटो एकदा बघाच.

अभिनेत्री करिश्मा कपूर बॉलीवूडपासून दूर असली तरी तिचे फॅन फॉलोईंग अजिबातच कमी झालेले नाही. तिच्या लूक्सची, तिच्या ड्रेसिंग सेन्सची आणि एकंदरीतच तिच्या फॅशन स्टाईलची नेहमीच चर्चा होत असते. सध्याही करिश्माच्या एका मिडी ड्रेसची चांगलीच चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. अगदी साधा आणि सिंपल दिसणारा हा ड्रेस करिश्माला कमालीचा शोभून दिसत असून तिच्या या ड्रेसची (supercool- stylish midi dress) किंमतही खूप जास्त नाही. त्यामुळे थर्टीफर्स्ट पार्टीसाठी ड्रेसिंग आणि लूक (dressing and look for new year party) कसा करावा असा विचार करत असाल, तर करिश्माचे हे स्टनिंग फोटो एकदा बघाच.

कुणाल कपूर यांच्या घरी कपूर कुटूंबियांनी नुकताच ख्रिसमस साजरा केला. या पार्टीसाठी करिश्मा तिच्या मुलांसोबत आली होती. त्यावेळी तिने हा ड्रेस घातला होता.

पिवळट डाग पडल्याने वॉश बेसिन खराब दिसतं? ३ उपाय, कमी मेहनतीत वॉश बेसिन चमकेल अगदी नव्यासारखं

लाल आणि क्रिम रंगाचं कॉम्बिनेशन असणारा हा ड्रेस खूपच सोबर आणि सिंपल प्रकारातला असला तरी त्यात नक्कीच एक वेगळी स्टाईल आहे. या ड्रेसवर अतिशय कमी ॲक्सेसरीज घालून करिश्माने तिचा लूक मेंटेन ठेवला होता. लाल रंगाची लिपस्टिक आणि डार्क काळ्या रंगाचा गॉगल करिश्माचे सौंदर्य आणखी वाढवणारे ठरले.

 

करिश्माने घातलेला ड्रेस The Summer House या ब्रॅण्डचा असून या ड्रेसची किंमत ५, ६०० रुपये आहे. आता ५- ६ हजार रुपये ही सर्वसामान्यांसाठी नक्कीच मोठी गोष्ट आहे.

तळपाय- टाचा रात्री खूप ठणकतात? करिना- आलियाची फिटनेस ट्रेनर सांगतेय ३ सोपे व्यायाम 

पण घसघशीत पगारामुळे नुकतीच नवश्रीमंत झालेली अशीही एक तरुण पिढी आहे, जी कपड्यांसाठी एवढे पैसे सहज खर्च करते. त्यामुळे या वर्गात मोडणाऱ्या तरुणी न्यु इयर पार्टीसाठी अशा एखाद्या ड्रेसचा विचार नक्कीच करू शकतात.  

 

टॅग्स :फॅशनकरिश्मा कपूरनाताळनववर्ष