Join us  

कतरिना कैफचा १ लाखाचा चमचमता 'पिट्टन' वर्क असलेला लेहेंगा!! बघा एम्ब्रॉयडरीचा हा नेमका कोणता प्रकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2023 6:17 PM

Katrina Kaif's Lehenga Worth Rs 1 Lakh: दिवाळीच्या निमित्ताने अभिनेत्री कतरिना कैफ हिने शेअर केलेले तिचे पिवळ्या लेहेंग्यातील फोटो तुम्ही पाहिले का?

ठळक मुद्देकतरिनाच्या या लेहेंग्यावर जी एम्ब्रॉयडरी आहे ती पिट्टन वर्क या प्रकारातली आहे. आता एम्ब्रॉयडरीचा हा प्रकार नेमका कोणता ते पाहूया...

दिवाळीचा सण सगळीकडे नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. या सणाचा उत्साह अगदी गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सगळ्यात ठिकाणी दिसून आला. दिवाळीचा झगमगाट चंदेरी दुनिया म्हणजेच बाॅलीवूडमध्येही दिसून आला. दिवाळीनिमित्त अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या सेलिब्रेशनचे सुंदर फोटो त्यांच्या चाहत्यांसाठी सोशल मिडियावर शेअर केले हाते. अभिनेत्री कतरिना कैफ (Katrina Kaif's Lehenga Worth Rs 1 Lakh) ही एरवी सोशल मिडियावर फार ॲक्टीव्ह नसते. पण दिवाळी आणि 'टायगर' (Tiger 3) चित्रपटामुळे ती देखील सध्या फुल टू ऑन असून तिने तिचे पिवळ्या रंगाच्या लेहेंग्यातले काही सुंदर फोटो सोशल मिडियावर शेअर केले आहेत.( pittan work embroidari)

 

कसा आहे कतरिनाचा लेहेंगा?

कतरिनाने तिचे जे काही फोटो शेअर केले आहेत, त्यात तिने घातलेला लेहेंगा कॉटन सिल्क सॅटिन या प्रकारातला असून लेहेंगा, ब्लाऊज आणि ओढणी हे माेनोटोनस रंगातले आहे.

मिस इंडिया’ झाल्यावरही प्रियांका स्वत:ला सुंदर समजत नव्हती! प्रियांका चोप्राची आई सांगते कारण..

लेहेंग्याचे ब्लाऊज व्ही नेक प्रकारातले असून गळ्याजवळ, ब्लाऊजच्या बाह्यांवर, लेहेंग्याच्या खालच्या भागावर आणि ओढणीवर भरगच्च एम्ब्रॉयडरी केलेली आहे. तिचा हा लेहेंगा देवनागरी या प्रसिद्ध डिझायनर हाऊसचा असून त्याची किंमत तब्बल १ लाख १० हजार रुपये आहे. कतरिनाच्या या लेहेंग्यावर जी एम्ब्रॉयडरी आहे ती पिट्टन वर्क या प्रकारातली आहे. आता एम्ब्रॉयडरीचा हा प्रकार नेमका कोणता ते पाहूया...

 

पिट्टन वर्क म्हणजे काय?

पिट्टन वर्क या एम्ब्रॉयडरी प्रकारात सोने, चांदी, रोझ गोल्ड, कॉपर या धातुंचे धागे वापरून विणकाम केले जाते. उत्तर प्रदेशातील सहारंगपूर हे या कलेचे उगमस्थान आहे, असे मानतात.

भारत-न्यूझीलंड मॅच पाहायला आलेल्या अनुष्का शर्माने घातलेला फुलाफुलांचा शर्ट पाहिला? त्या शर्टची किंमत होती.....

पण सध्या जयपूरमध्ये अशा प्रकारचे विणकाम खूप जास्त प्रमाणात केले जातो. या विणकामाची धाटणी गोटा पट्टी वर्कशी मिळतीजुळती आहे. पुर्वी हाताने पिट्टन वर्क केले जायचे. पण आता मात्र बहुतांश ठिकाणी मशिनचा वापर करूनच पिट्टन वर्क केले जाते.  

टॅग्स :फॅशनदिवाळी 2023कतरिना कैफ