Lokmat Sakhi >Fashion > पाहा कियारा आडवाणीच्या नाजूक मंगळसूत्राची खास झलक, किंमत ऐकाल तर...

पाहा कियारा आडवाणीच्या नाजूक मंगळसूत्राची खास झलक, किंमत ऐकाल तर...

Kiara Advani Siddharth Malhotra Wedding Mangal sutra Design : कोटींमध्ये किंमत असलेल्या या मंगळसूत्राची खासियत...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2023 10:50 AM2023-02-12T10:50:19+5:302023-02-12T11:12:21+5:30

Kiara Advani Siddharth Malhotra Wedding Mangal sutra Design : कोटींमध्ये किंमत असलेल्या या मंगळसूत्राची खासियत...

Kiara Advani Siddharth Malhotra Wedding Mangal sutra Design : Check out the exclusive glimpse of Kiara Advani's delicate mangalsutra, hear the price... | पाहा कियारा आडवाणीच्या नाजूक मंगळसूत्राची खास झलक, किंमत ऐकाल तर...

पाहा कियारा आडवाणीच्या नाजूक मंगळसूत्राची खास झलक, किंमत ऐकाल तर...

प्रसिद्ध अभिनेत्री कियारा आडवाणी आणि अभिनेता सिद्धार्थ म्हलोत्रा ७ फेब्रुवारी रोजी लग्नगाठ बांधली. बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध असलेल्या या जोडीच्या नात्यावर अखेर शिक्कामोर्तब झाले. या दोघांचे लग्न म्हणजे एक शाही सोहळा असल्याचे आपल्याला त्यांच्या फोटोवरुन पाहायला मिळाले. राजस्थानमधील जैसलमेर याठिकाणी सूर्यगड पॅलेसमध्ये हा विवाह सोहळा पार पडला. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडल्यानंतर दोघेही दिल्लीला रवाना झाले. लग्नानंतर दिल्ली एअरपोर्टवर आणि सिद्धार्थच्या घराबाहेरचे या दोघांचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले. यामध्ये कियाराचा नव्या नवरीचा लूक पाहायला मिळाला. यावेळी सर्वांच्या नजरा कियाराच्या मंगळसूत्रावर खिळल्या (Kiara Advani Siddharth Malhotra Wedding Mangal sutra Design).

बॉलिवूडमधील अभिनेत्री करत असलेली फॅशन त्यांच्या चाहत्यांमध्ये खूप चर्चेचा विषय असते. महिला वर्गाचे लक्ष या अभिनेत्रींच्या दागिन्यांकडे असल्याचे पाहायला मिळते. या अभिनेत्रींचे मंगळसूत्र अतिशय नाजूक असले तरी त्याची डिझाईन अतिशय हटके असल्याने त्याची किंमतही तितकीच जास्त असते. कियाराचे मंगळसूत्रही थोडेथोडके नाही तर तब्बल २ कोटी रुपयांचे असल्याचे म्हटले जात आहे. हे मंगळसूत्र प्रसिद्ध फॅशन डिझायनर सब्यसाची मुखर्जी यांनी डिझाईन केलेले आहे. सब्यसाची मुखर्जी हे प्रसिद्ध डिझायनर असून बॉलिवूडमधील बहुतांश अभिनेत्रींचे दागिने तेच डिझाईन करतात. या मंगळसूत्रात विशेष काहीच नसून ते अतिशय सिंपल असल्याचे दिसते. एक सिंपल सोन्याची चेन, त्याला मध्यभागी काळे मणी आणि डायमंडचे गोलाकार पेंडंट अशी त्याची डिझाईन आहे. 

याआधीही प्रियांका चोप्रा, अनुष्का शर्मा, सोनम कपूर, पत्रलेखा, यामी गौतम, दिपिका पदुकोण, कतरीना कैफ, आलिया भट, आथिया शेट्टी यांसारख्या अभिनेत्रींच्या मंगळसूत्राच्या डिझाईनबाबत आणि किमतीबाबत चाहत्यांमध्ये बरीच उत्सुकता असल्याचे पाहायला मिळाले होते. कियाराला सिद्धार्थने घातलेली अंगठीही डिझायनर असून या डायमंड रिंगची किंमतही काही कोटींमध्ये असल्याचे बोलले जात आहे. ९ फेब्रुवारी रोजी त्यांनी दिल्लीत रिसेप्शन दिले असून १२ फेब्रुवारी रोजी बॉलिवूडमधील कलाकारांसाठी मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.  

Web Title: Kiara Advani Siddharth Malhotra Wedding Mangal sutra Design : Check out the exclusive glimpse of Kiara Advani's delicate mangalsutra, hear the price...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.