Lokmat Sakhi >Fashion > काजोलने नेसलेल्या पिंक सिक्विन साडीची किंमत माहितीये? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

काजोलने नेसलेल्या पिंक सिक्विन साडीची किंमत माहितीये? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

Know amount of Kajol Pink sequin fuschia saree from manish malhotra fashion show : काजोल या साडीत अतिशय देखणी आणि तितकीच हॉट दिसत होती यात वाद नाही.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2023 03:32 PM2023-08-02T15:32:10+5:302023-08-02T15:47:40+5:30

Know amount of Kajol Pink sequin fuschia saree from manish malhotra fashion show : काजोल या साडीत अतिशय देखणी आणि तितकीच हॉट दिसत होती यात वाद नाही.

Know amount of Kajol Pink sequin fuschia saree from manish malhotra fashion show :Do you know the price of pink sequin saree worn by Kajol? You will also be shocked to hear... | काजोलने नेसलेल्या पिंक सिक्विन साडीची किंमत माहितीये? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

काजोलने नेसलेल्या पिंक सिक्विन साडीची किंमत माहितीये? ऐकून तुम्हालाही बसेल धक्का...

अभिनेते आणि अभिनेत्री घालत असलेले कपडे किती महागाचे असतात याचा आपल्याला अंदाज आहेच. त्यातही फॅशन शोमध्ये स्वत:ला आणि फॅशन डिझायनरला प्रेझेंट करण्यासाठी हे लोक लाखांमध्ये किंमत असलेले कपडे परीधान करतात. त्यांच्या या कपड्यांच्या जोरदार चर्चाही रंगतात आणि त्याच्या किंमतीवरुन आश्चर्य व्यक्त करण्यात येते. बॉलिवूडमधील गाजलेली अभिनेत्री काजोल हिने नुकतीच मनिष मल्होत्राच्या ब्रायडल कलेक्शन शोमध्ये हजेरी लावली होती. या शोमध्ये काजोलच्या पिंक रंगाच्या साडीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. अतिशय डिसेंट आणि तरीही तितकीच उठावदार असलेली काजोलची सिक्विन साडी तिच्यावर अतिशय खुलून दिसत होती (Know amount of Kajol Pink sequin fuschia saree from manish malhotra fashion show). 

(Image : Google)
(Image : Google)

बेबी पिंक आणि डार्क पिंक रंगाचे कॉम्बिनेशन असलेली ही साडी साधारणपणे टिकल्यांची असल्याचे आपल्याला लांबून पाहिल्यावर वाटते. काजोल आणि मनिष मल्होत्रा यांच्यात अतिशय छान मैत्री असून त्याच्या बहुतांश फॅशन शोमध्ये काजोलची हजेरी असतेच. फुशिया पिंक सिक्विन जॉर्जेट साडी काजोलने अतिशय परफेक्टली कॅरी केल्याने तिचे व्यक्तिमत्त्व खुलून आले. यावर काजोलने मिनीमम मेकअप केला होता. गालांना हायलाईट करुन केवळ लायनर आणि गुलाबी लिपस्टीक इतकेच तिने लावल्याचे दिसत होते. तसेच ज्वेलरीही जास्त न घातल्याने सगळ्यांचेच लक्ष साडीकडे वेधले जात होते. काजोलच्या चेहऱ्यावरचा ग्लो आणि तिच्या डोळ्यातले बोलके भाव यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडली होती. 

छानसे डिझायनर कानातले घातल्याने तिचा लूक पूर्ण झाला होता. काजोलने यावर स्ट्रीपचे बेबी पिंक रंगाचे ब्लाऊज घातल्याने ती अतिशय हॉट दिसत होती. मोकळे सोडलेले स्ट्रेट केस काजोलला एक एलिगंट आणि मॅच्युअर लूक देत होते. तर या साडीची किंमत थोडीथोडकी नसून तब्बल २ लाख २५ हजार इतकी आहे. त्यामुळे इतकी महाग साडी अभिनेत्रीच नेसू शकतात. या दोन रंगातील साडीतील काजोलला पाहून काही काळ आपल्याला तिच्या कुछ कुछ होता हैच्या फेडेड साडीतील लूक आठवला तर नवल नाही.  


 

Web Title: Know amount of Kajol Pink sequin fuschia saree from manish malhotra fashion show :Do you know the price of pink sequin saree worn by Kajol? You will also be shocked to hear...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.