Join us  

स्तन ओघळले, फिगर चांगली नाही म्हणून लाज वाटते, कॉन्फिडन्स कमी झाला? ५ टिप्स - दिसा स्मार्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2023 10:55 PM

Loose Breast Tightening Style Tips : ओघळलेल्या स्तनांमुळे काहीवेळ स्त्रिया आपल्या आवडीचे किंवा मनपसंत वेगवेगळे स्टायलिश कपडे घालणे टाळतात.

प्रत्येक स्त्रीला आपण फिट रहावं आणि सुंदर दिसावं असं मनोमन वाटत असत. जेव्हा गोष्ट स्तनांच्या आकाराविषयी येते तेव्हा स्तन हे सुडौल व्यवस्थित शेपमध्ये दिसावते यासाठी स्त्रिया प्रयत्नशील असतात. परंतु वयोमानाप्रमाणे, मोनोपॉज, प्रेग्‍नेंसी, वेट लॉस, वेट गेन यांसारख्या असंख्य कारणांमुळे स्त्रियांच्या स्तनांचा सुडौलपणा जाऊन ते लूज पडून खाली ओघळल्यासारखे दिसतात. अशा ओघळलेल्या स्तनांमुळे काहीवेळ स्त्रिया आपल्या आवडीचे किंवा मनपसंत वेगवेगळे स्टायलिश कपडे घालणे टाळतात. अशा परिस्थिती आपण कितीही महागडा ड्रेस परिधान केला तरीही लूज पडलेल्या स्तनांमुळे त्या ड्रेसला हवा तसा मनपसंत लूक येत नाही. अशावेळी काही स्टायलिंग टिप्सचा वापर करून आपण आपल्या स्तनांचा लूजपणा लपवू शकता(Loose Breast Tightening Style Tips).    

 

स्तनांचा लूजपणा लपविण्यासाठी काय आहेत स्टायलिंग टीप्स... 

१. योग्य ब्रेसीयरची निवड :- अंतर्वस्त्र विकत घेताना त्यांची निवड ही योग्यच असली पाहिजे. चुकीच्या पद्धतींची अंतर्वस्त्र विकत घेतल्याने आपल्याला विविध शारीरिक, आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या उद्भवू शकतात. जर आपल्याला कोणत्याही आऊटफिटमध्ये स्टायलिश दिसायचे असेल तर योग्य प्रकारच्या अंतर्वस्त्राची निवड करणे अतिशय महत्वाचे ठरते. जर आपल्या स्तनांना लूजपणा आला असेल किंवा स्तन जास्त ओघळलेले असतील तर अशावेळी स्तनांचा आकार व्यवस्थित दिसण्यासाठी योग्य ब्रेसीयरची निवड करणे आवश्यक आहे. स्तनांचा लूजपणा लपविण्यासाठी आपण फुल कप ब्रा, अंडरवायर्ड ब्रा, पुश-अप ब्रा, फुल कवरेज ब्रा अशा विविध प्रकारच्या ब्रेसीयरची निवड करु शकता. अशा प्रकारच्या ब्रेसीयरची निवड केल्याने लूज झालेल्या स्तनांना एक प्रकारचा योग्य आकार प्राप्त होऊन ते व्यवस्थित शेपमध्ये दिसतील. या विविध प्रकारच्या ब्रेसीयर घातल्यामुळे स्तनांना योग्य आकार प्राप्त झाल्यामुळे कोणत्याही प्रकारचे आऊटफिट घातल्यामुळे आपले स्तन लूज किंवा ओघळलेले दिसणार नाहीत.

 

२. वी - नेक पॅटर्न असणाऱ्या ड्रेसची निवड करा :- काही स्त्रियांच्या स्तनांचा आकार थोडा मोठा असतो. काहीवेळा स्तनांचा आकार मोठा असल्याकारणाने देखील स्तन लूज किंवा ओघळलेले वाटू शकतात. अशा परिस्थिती योग्य ब्रेसीयर आपल्या स्तनांना शेप किंवा आकार प्राप्त करून देण्यास मदत करू शकतात. स्तनांचा मोठा असणारा आकार लपविण्यासाठी किंवा ड्रेस घातल्यावर स्तन लहान दिसण्यासाठी आपण बॉडी हगिंग ड्रेस आणि टॉप्सचा जास्तीत जास्त वापर करावा. स्तनांचा आकार मोठा असणाऱ्या महिलांनी वी - नेक असणाऱ्या ड्रेसचा वापर करावा. ड्रेसचा वी - नेक असल्याकारणाने आपल्या स्तनांचा आकार लहान व योग्य शेपमध्ये दिसण्यास मदत होईल. 

३. वेस्ट लाईन हायलाईट करा :- आपल्या स्तनांचा लूजपणा किंवा मोठ्या स्तनांचा आकार लपविण्यासाठी आपल्या वेस्ट लाईनला हायलाईट करणे हा देखील एक उत्तम पर्याय असू शकतो. आपण अशाप्रकारचे टॉप किंवा ड्रेस निवडू शकता जे आपल्या वेस्ट लाईनला व्यवस्थित हायलाईट करु शकतात. वेस्ट लाईनला अधिक हायलाईट करण्यासाठी आपण स्टायलिश किंवा डिझायनर बेल्ट्स किंवा त्यासंदर्भातील अ‍ॅक्सेसरीजचा वापर करु शकता. जर आपण बॉडी हगिंग पद्धतीचे ड्रेस घालणे पसंत करत असाल तर त्यासोबत एखादा स्टायलिश किंवा डिझायनर बेल्ट्स परिधान केल्याने आपले स्तन लूज किंवा ओघळलेले दिसणार नाहीत. 

४. या प्रकारचे टॉप आणि ड्रेस निवडा :- ओघळलेल्या स्तनांच्या आकारामुळे जर आपण रॅप ड्रेस घालणे टाळत असाल तर हे चुकीचे ठरु शकते. याउलट स्तनांचा लूजपणा लपविण्यासाठी आपण रॅप ड्रेस किंवा टॉपची निवड करणे हा सर्वोत्तम पर्याय ठरु शकतो. इतकेच नव्हे तर आपण फिट अँड फ्लेयर पद्धतींचे  ड्रेस देखील वापरु शकता. फिट अँड फ्लेयर पद्धतींच्या ड्रेसमध्ये, कपड्याचा एक्स्ट्रा घोळ किंवा फ्लेयर हा कमरेच्या खालच्या भागात असतो. असे ड्रेसेस छातीकडून फिट आणि कमरेपासून खाली फ्लेयर होत जातात. यामुळे देखील आपल्या स्तनांचा लूजपणा लपविला जाऊ शकतो. ब्रेस्‍ट शेप व्यवस्थित दिसण्यासाठी आपण वेगवेगळ्या प्रकारचे जॅकेट, श्रग यांचा देखील वापर करु शकता.

   

५. ड्रेसच्या नेकलाईन आणि बाह्यांची योग्य निवड :- ओघळलेले स्तन किंवा स्तनांचा आकार मोठा असल्यास ड्रेसेसच्या नेकलाईन आणि बाह्यांची निवड करताना सावधानता बाळगा. वी - नेकलाईन असणारा ड्रेस हा उत्तम पर्याय असू शकतो. याबरोबरच बाह्यांची निवड करताना फ्लटर, बलून शेप , फ्लेयर आणि  पफ डिझाईन असणाऱ्या बाह्यांची निवड करा. अशा प्रकारच्या बाह्यांमुळे आपले ओघळले स्तन लपविले जातील.

 

  

टॅग्स :फॅशन