Join us  

दीपिका पादुकोणचा टर्टल नेक टी शर्ट आवडला? ‘टर्टल नेक’ची नवी फॅशन क्रेझ, द्या स्वत:ला नवीन लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2023 1:04 PM

Deepika Padukone’s oversized trench coat is the ultimate airport fashion goal : दीपिका पादुकोणच्या स्टाइल्स अतिशय मिनिमल आणि तरी देखण्या असतात, टर्टल नेक शर्टची स्टाइल त्यापैकीच एक

दीपिका पादुकोण तिच्या अभिनय कौशल्याने आणि वेगवेगळ्या प्रकारच्या कपड्यांमुळे सतत चर्चेत असते. ती वेस्टर्न सोबतच पारंपरिक कपडे अतिशय योग्य पद्धतीने कॅरी करताना दिसते. बदलत्या ट्रेंडनुसार दीपिकाच्या वॉर्डरोबमध्ये ओवरसाइझ्ड शर्ट्स, स्टेटमेंट जॅकेट्स, जॉगर्स पँट, स्लाउची जीन्स, मोनोटोन सलवार सूट आणि डिझाइनर साड्यांचे हटके कलेक्शन पाहायला मिळते आहे. तिच्या आगामी फायटर या हिंदी चित्रपटातील एका महत्वाच्या सीनचे शूटिंग संपवून ती मुंबईत परत आली तेव्हा तिच्या  एअरपोर्ट क्लासी लूकची चर्चा झाली.

 

दीपिकाने काळ्या रंगाची ट्राऊझर पॅन्ट, टर्टलनेकचा काळ्या रंगाचा टीशर्ट, हायनेक पिंक ओव्हरसाईझ लॉंग चेक्सचा कोट, पायांत पांढऱ्या रंगाचे स्नीकर्स श्यूज घातले आहेत. दीपिका कपड्यांसोबतच त्यावर परफेक्ट मॅचिंग ऍक्सेसरीज देखील परिधान करण्यात माहिर आहे. या लुकला मॅचिंग होणारी गेरुआ रंगाची एक छानशी पर्स तिने कॅरी केली आहे.  मिडल पार्टीशन करून केसांचा एक क्लिन बन बांधला आहे तिची ही हेअरस्टाईल कपड्यांना मॅच होईल अशीच आहे. दीपिकाने आपल्या इंस्टाग्राम पेजवरून या हटके एअरपोर्ट लूकचे फोटोज शेअर केले आहेत. दीपिकाने काळ्या रंगाच्या टार्टलनेक टीशर्ट वरती मल्टिकलरचे जाड जॅकेट परिधान केलेले दिसत आहे(Deepika Padukone’s oversized trench coat is the ultimate airport fashion goal).

टर्टलनेक शर्टची फॅशनटर्टलनेक शर्टची सध्या फॅशन आहे. एक हजार रुपयांपासून हे शर्ट मिळतात. आपणही टर्टल नेक शर्ट, जॅकेट, जिन्स असा छानसा लूक करु शकतो. टर्टल नेक विंटर वेअर म्हणून जास्त वापरले जातात. त्यामुळे थंडी संपायच्या आत ही स्टाइल करुन पाहता येईल..

टॅग्स :फॅशन