Join us  

मनिष मल्होत्रांच्या आकाशी साडीत खुलले माधुरीचे सौंदर्य- रेशमाची जर असलेल्या साडीची बघा नजाकत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2024 11:39 AM

Beauty Of Madhuri Dixit's Ice Blue Saree: सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा (Manish Malhotra) यांनी डिझाईन केलेत्या साडीतले माधुरी दीक्षितचे काही फोटो सोशल मिडियावर खूप व्हायरल झाले आहेत, त्या साडीची नजाकत एकदा बघायलाच हवी...

ठळक मुद्देएकंदरीतच माधुरीची साडी, मेकअप आणि दागिने या सगळ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. 

अतिशय डिसेंट लूक आणि सोबर कपडे घालणे ही अभिनेत्री माधुरी दीक्षितची (Madhuri dixit) आणखी एक ओळख आहे. त्यामुळेच तिचा ड्रेसिंग सेन्स महिलांना जबरदस्त भावून जातो. खासकरून माधुरी दीक्षितच्या साड्या हा तर गर्ल्स टॉकमधला नेहमीचाच एक विषय. आता पुन्हा एकदा तिच्या लूकची चर्चा व्हावी, अशी सुंदर साडी तिने नेसली आहे. आधीच साडी म्हणजे बहुसंख्य महिलांचा विकपॉईंट (saree lover). आणि त्यात ती साडी जर माधुरीने नेसली असेल (ice blue colour saree) आणि सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा ( Manish Malhotra) यांनी ती डिझाईन केली असेल तर त्या साडीचे खुललेले सौंदर्य तर बघायलाच हवे...

 

माधुरीने नेसलेल्या साडीचा रंगच मुळात अतिशय लोभस आहे. पांढऱ्या किंवा मोतिया रंगावर हलकीशी निळसर झाक असावी, अशा प्रकारची ती साडी ऑर्गेंझा सिल्कची आहे. दिवसा किंवा रात्री कोणत्याही वेळी ही साडी नेसली तरी ती अंगावर शोभूनच दिसेल, एवढा सुंदर तिचा रंग आहे.

धूळ बसून खिडक्यांची जाळी काळपट झाली? १ सोपा उपाय- ५ मिनिटांत खिडक्या चकाचक...

साडी पुर्णपणे प्लेन असून साडीच्या काठांवर मात्र मोठ्या आकाराची फुलं आणि पानं आहेत. रेशीम काम करून फुलं आणि पानं विणण्यात आली आहेत. पण त्या रेशीम कामाच्या बेसवर सेक्विन वर्कने तसेच क्रिस्टल्स आणि ग्लास बीड्स लावून हायलाईट करण्यात आले आहे. त्यामुळे साडीच्या रंगाचे विणकाम असले तरी ते खास उठून दिसते.

 

साडीचा आणि ब्लाऊजचा रंग एकसारखाच आहे. मात्र स्लिव्हलेस आणि बंद गळा असणाऱ्या ब्लाऊजवर साडीपेक्षाही जास्त हेवी सेक्विन आणि क्रिस्टल वर्क करण्यात आले आहे.

बैठं काम केल्याने किंवा खूप प्रवास झाल्याने पाय आखडून गेले? ५ मिनिटांचे सोपे व्यायाम- लवकर आराम मिळेल

या साडीवर माधुरीने ग्लाॅसी शेड मेकअप केला असून अतिशय कमी दागिने घातले आहेत. तिने घातलेली अंगठी आणि ब्रेसलेट नारायण ज्वेलर्स या ब्रॅण्डचे आहेत. तर कानातले माया संघवी यांच्या ब्रॅण्डहाऊसमधून डिझाईन करण्यात आले असून ते अनकट डायमंड या प्रकारातले आहेत आणि त्या कानातल्यांवर रशियन आणि झाम्बियन खडे जडविण्यात आलेले आहेत. एकंदरीतच माधुरीची साडी, मेकअप आणि दागिने या सगळ्याच गोष्टी बघण्यासारख्या आहेत. 

 

टॅग्स :फॅशनमाधुरी दिक्षितसाडी नेसणेमनीष मल्होत्रास्टायलिंग टिप्स