माधुरी दीक्षित (Madhuri dixit), सलमान खान, रेणुका शहाणे, मोहनीश बहल या कलावंतांच्या भुमिका असणारा हम आपके है कौन (Hum Aapke Hai Kaun...) हा चित्रपट म्हणजे बॉलीवूड चित्रपटांमध्ये आलेलं एक हवंहवंसं वादळ होतं. कित्येक जणांना या चित्रपटाने अक्षरश: वेड लावलं. काहींनी तर या चित्रपटाची पारायणं केली... कारण एकदा तो पाहून समाधान व्हायचंच नाही. पुन्हा पुन्हा पाहात राहावी अशी ही अपूर्व कलाकृती होती. त्यातले निशा, प्रेम, पुजा तर अनेकांच्या मनात अजूनही आहेतच.. म्हणूनच जेव्हा तब्बल ३० वर्षांनी माधुरी पुन्हा निशाच्या (Nisha) त्याच गाजलेल्या गेटअपमध्ये अवतरली (Madhuri dixit's blue purple saree look) तेव्हा तिला पाहणारे मनाने थेट ३० वर्षे मागे फेकले गेले आणि पुन्हा एकदा त्या नटखट, चुलबुली निशाच्या प्रेमात पडले....
माधुरीने हम आपके है कौन या चित्रपटाच्या 'दिदी तेरा देवर दिवाना..' या चित्रपटात निळ्या- जांभळ्या रंगाची एक सुंदर साडी नेसली होती. ती साडी, साडीवरचं माधुरीचं ब्लाऊज, तिची हेअरस्टाईल, पदर घेण्याची पद्धत आजही अनेकांच्या लक्षात आहेच.
मूग, मटकी, चवळीला लवकर भुंगा लागतो- किडे होतात? १ सोपा उपाय- कडधान्य चांगलं टिकेल
तर अगदी त्याच साडीसारखी सुंदर निळसर जांभळ्या रंगाची साडी नेसून माधुरी काही दिवसांपुर्वी एका डान्स रिॲलिटी शोमध्ये गेली. या साडीवर तिने छान अंबाडा घातला होता आणि गळ्यात मोठा डायमंड सेट घातला होता. शिवाय तिच्या ब्लाऊजचा मागचा गळाही अगदी निशाच्या ब्लाऊजप्रमाणेच होता.
या साडीमध्ये माधुरीला पाहून अनेकांनी तिला 'टाईमलेस ब्यूटी' अशी कमेंट दिली आहे.
केस पांढरे झाले, खूप गळतात- वाढही खुंटली? केसांच्या सगळ्या समस्या सोडविणारा १ खास उपाय
कुणी 'सलमान खानला बोलवा' असं म्हटलंय तर कुणी माधुरीचं वय वाढलं पण सौंदर्य मात्र कमी झालेलं नाही, अशा कमेंट केल्या आहेत.