वयाच्या पन्नाशीतही माधुरी दीक्षितची क्रेझ आणि ग्लॅमर जराही कमी झालेले नाही. आजही तिचे चाहते तिची एखादी झलक पाहण्यासाठी तेवढेच झुरत असतात. पन्नाशी उलटून गेली तरी तिच्या हसण्यातलं, दिसण्यातलं माधुर्य जराही कमी झालेलं नाही. आता हेच बघा ना माधुरी दीक्षितने तिचे काही सुंदर फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले असून ते फोटो सध्या जबरदस्त व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये माधुरीने जांभळा आणि गुलाबी असे अनेक जणींचं ऑल टाईम फेव्हरेट असणाऱ्या कॉम्बिनेशनची साडी नेसली असून ती साडी माधुरीवर खूपच शोभून दिसते आहे. तिच्या या साडीची किंमत तब्बल पाऊण लाखांच्या घरात जाणारी आहे. (Madhuri Dixit's pink purple bandhani silk saree worth Rs 75k)
कशी आहे माधुरी दिक्षितची साडी?
माधुरी दीक्षितने नेसलेली जांभळी- गुलाबी साडी ही बांधणी प्रकारातली आहे. पण या साडीवर सरसकट सगळीकडे बांधणी वर्क केलेले नाही.
स्वस्तातलं फर्निचरही दिसेल महागडं आणि क्लासी, २ साेपे उपाय, कमी पैशात बदलून टाका घराचा लूक
साडीच्या काठांना जो जांभळा पट्टा आहे, त्या भागातच केवळ बांधणी वर्क असून दोन्हीकडच्या काठांच्या आतला गुलाबी भाग पुर्णपणे प्लेन आहे. जांभळ्या काठांच्या बॉर्डरवर गोटा पट्टी वर्क, किरण वर्क करण्यात आलं असून तिथे भरगच्च कुंदन वर्क केलेलं आहे. तिची ही साडी Raw Mango फॅशन हाऊसच्या किर्ती कलेक्शनमधली असून साडीची किंमत ७५ हजार रुपये आहे.
अतिशय सुंदर रंगसंगती असणाऱ्या या साडीवर माधुरीने जांभळ्या रंगाचं हेवी वर्क असणारं ब्लाऊज घातलं आहे.
बॉलीवूड सेलिब्रिटींसारखी साडी नेसण्यासाठी ५ टिप्स, बघा स्टायलिश- आकर्षक दिसण्यासाठी कशी नेसायची साडी
बांधणी साडीवर बांधणीचं ब्लाऊज न घालता इतर कोणतंही ब्लाऊज घातलं तरी ते किती शोभून दिसू शकतं, हे माधुरीचे फोटो पाहून लक्षात येतं. हेवी ब्लाऊजसोबतच माधुरीने मल्टी कलरचे हेवी दागिने घातले आहेत. ग्लॉसी मेकअपमुळे माधुरी आणखीनच सुंदर आणि आकर्षक दिसते आहे.