Lokmat Sakhi >Fashion > ७९ हजारांच्या साडीवर मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज; त्याचं डिझाईन पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

७९ हजारांच्या साडीवर मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज; त्याचं डिझाईन पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

Malaika Arora's Stunning Look In Latkan Blouse: बॉलीवूडची फॅशनिस्टा मलायका अरोरा हिने नुकत्याच नेसलेल्या एका साडीची आणि त्या साडीवरच्या तिच्या ब्लाऊजची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2025 12:50 IST2025-01-15T12:50:01+5:302025-01-15T12:50:58+5:30

Malaika Arora's Stunning Look In Latkan Blouse: बॉलीवूडची फॅशनिस्टा मलायका अरोरा हिने नुकत्याच नेसलेल्या एका साडीची आणि त्या साडीवरच्या तिच्या ब्लाऊजची सध्या सोशल मीडियावर खूपच चर्चा आहे..

Malaika Arora looks stunning in ₹79K saree with unique latkan fashion blouse | ७९ हजारांच्या साडीवर मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज; त्याचं डिझाईन पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

७९ हजारांच्या साडीवर मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज; त्याचं डिझाईन पाहूनच नेटिझन्स म्हणाले... 

Highlightsसध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे मलायकाचं ब्लाऊज आवडलं असेल तर एखाद्या डिझायनर, पार्टीवेअर साडीवर तुम्ही तसं शिवून घेऊ शकता. 

मलायका अरोरा (Malaika Arora) हे नाव नेहमीच चर्चेत असतं. कधी तिच्या योगामुळे, कधी तिच्या फिटनेसमुळे, कधी तिच्या फॅशनेबल कपड्यांमुळे तर कधी खाजगी आयुष्यामुळे तिच्याबद्दल नेहमीच बोललं जातं. आता पुन्हा एकदा मलायका खूप जास्त चर्चेत आली आहे. यावेळी तिच्याबद्दल एवढं बोलल्या जाण्यामागचं कारण म्हणजे तिने घातलेलं ब्लाऊज. मलायकाचा एक व्हिडीओ सध्या बराच व्हायरल झाला असून यामध्ये तिने अगदी फिकट निळसर, हिरवट रंगाची साडी नेसली आहे. त्या प्लेन साडीचे काठ खूप हेवी असून त्यावरचं ब्लाऊज तर फॅशन वर्ल्डमध्ये एकदम वेगळा ट्रेण्ड घेऊन येणारं ठरू शकतं असं आहे. ते ब्लाऊज पाहूनच नेटिझन्सनी त्याला लटकन ब्लाऊज असं नाव देऊन टाकलं आहे. ते ब्लाऊज नेमकं कसं आहे आणि त्याची एवढी चर्चा का ते पाहूया..(Malaika Arora looks stunning in ₹79K saree with unique latkan fashion blouse)


 

मलायका अरोराने घातलं लटकन ब्लाऊज

मलायकाने जी मिंट रंगाची चमकदार शिफॉन साडी नेसली आहे ती Vvani या फॅशन ब्रॅण्डची असून त्यावरचं ब्लाऊज जॉर्जेटचं आहे. मिंट रंगाच्या साडीला अतिशय हेवी डिझाईन असलेले मोतिया रंगाचे काठ असून ते मोती वर्क आणि मिरर वर्क करून सजविण्यात आले आहेत.

पांढरे केस एका मिनिटांत काळे करणारी स्टिक फक्त १३० रुपयांत! मेहेंदी नको नी हेअर कलर नको!

याशिवाय साडीवरचं ब्लाऊजही मोतिया रंगाचं असून ब्लाऊजच्या बाह्यांवर मोठमोठ्या आकाराचे अनेक झुमके आहेत. ब्लाऊजच्या बाह्या पुर्ण मनगटापर्यंत लांब असून त्यावर गाेलाकार पद्धतीने लटकन लावलेले आहेत. लटकनच्या तब्बल ५ लेयर्स एका खाली एक याप्रमाणे तिच्या बाह्यांवर लावलेल्या आहेत.


 

एवढंच नाही तर ब्लाऊजच्या इतर भागावरही खूप हेवी मोती वर्क, मिरर वर्क, सेक्विन वर्क करण्यात आलेले आहे. मलायकाने साडीही खूपच वेगळ्या पद्धतीने नेसली आहे.

खूप काळजी न घेताही झटपट वाढणाऱ्या ५ वेली- बाग होईल हिरवीगार- दिसेल छान

त्यामुळे ती खरंतर ट्रोलसुद्धा होत आहे. साडीचा पदर पुढच्या बाजुने पोटाजवळ खूपच वेगळ्या पद्धतीने पिनअप केला आहे. मागून, पुढून दोन्ही बाजुने डिप नेक असणाऱ्या ब्लाऊजवर मलायकाने चंदेरी रंगाचे दागिने घातले आहेत. सध्या लग्नसराई सुरू आहे. त्यामुळे मलायकाचं ब्लाऊज आवडलं असेल तर एखाद्या डिझायनर, पार्टीवेअर साडीवर तुम्ही तसं शिवून घेऊ शकता. 

 

Web Title: Malaika Arora looks stunning in ₹79K saree with unique latkan fashion blouse

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.