Lokmat Sakhi >Fashion > मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत

मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत

Malaika Arora's Banarasi Saree: मलायका अरोराच्या महागड्या साडीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.. बघा नेमकी आहे तरी कशी तिच्या  बनारसी साडीची नजाकत..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2023 04:49 PM2023-08-08T16:49:56+5:302023-08-08T16:54:24+5:30

Malaika Arora's Banarasi Saree: मलायका अरोराच्या महागड्या साडीने पुन्हा एकदा तिच्या चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.. बघा नेमकी आहे तरी कशी तिच्या  बनारसी साडीची नजाकत..

Malaika Arora's lime green Banarasi saree from Anita Dongare's collection worth Rs. 75 thousand  | मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत

मलायका अरोराची ७५ हजारांची बनारसी साडी!! पोपटी रंगाच्या भरजरी साडीची पाहा खासियत

Highlightsसाधे पण आकर्षक दागिने आणि ग्लॉसी मेकअप केलेली मलायका या साडीत आकर्षक दिसत आहे.  तिने नेसलेली साडी बनारसी सिल्क प्रकारातली असून ती प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कलेक्शनमधली आहे.

मलायका अरोराच्या ड्रेसिंग सेन्सची बऱ्याचदा चर्चा होते. तिच्या फॅशन सेन्सबद्दल बाेलताना बऱ्याचदा असे म्हटले जाते की मनासारखे, जे हवे ते कपडे घालण्याची जबरदस्त हिंमत तिच्यामध्ये आहे. ती सगळ्याच प्रकारचे कपडे खूप छान पद्धतीने कॅरीसुद्धा करते. पण तरीही तिचा कपड्यांचा चॉईस अनेकांना आवडत नाही. पण यावेळी मात्र तसे मुळीच झालेले नाही. उलट तिच्या फॅशन सेन्सचं अनेक जण भरभरून कौतूक करत आहे (Malaika Arora's lime green saree). मलायकाने नेसलेली साडी पाेपटी- लिंबू या रंगातली असून साडीची किंमत तब्बल पाऊण लाख रुपये (Malaika Arora's Banarasi Saree worth Rs. 75 thousand) असल्याचं सांगितलं जातं. 

 

मलायका अरोराच्या साडीची नजाकत
मलायका अरोराने तिचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये तिने नेसलेली साडी बनारसी सिल्क प्रकारातली असून ती प्रसिद्ध सेलिब्रिटी डिझायनर अनिता डोंगरे यांच्या कलेक्शनमधली आहे.

आपला बॉडीशेप नेमका कोणता, त्याप्रमाणे कोणते आणि कसे कपडे निवडायचे? ५ टिप्स, दिसा स्मार्ट आणि सुंदर

तिच्या या साडीवर असणारी कलाकुसर अतिशय नाजूक आणि महागडी आहे. त्यामुळे साडीची किंमतही तब्बल ७५ हजार रुपयांपर्यंत गेली आहे. अतिशय तलम सूत असणाऱ्या या साडीचा काठ गोटा पट्टी प्रकारातला आहे. शिवाय काठांवर सोनेरी जरीकामात विणलेले मोठे मोठे पानांचे डिझाईन आणि काही ठिकाणी सेक्विन वर्कही केलेले आहे. संपूर्ण साडीवर गोल्डन बुट्टी आहेत. त्यामुळे साडी अतिशय भरजरी वाटते.

 

साडीचे ब्लाऊजही साडीच्याच रंगाचे म्हणजेच पोपटी किंवा लिंबू रंगाचे आहे. व्ही नेक असणारे ब्लाऊज स्लिव्हलेस आणि क्रॉप  शेप प्रकारातले आहे. या साडीवर मलायकाने ऑक्सिडाईज प्रकारातले दागिने घातले आहेत.

पावसाळ्यात चिवडा वातड होऊ नये, पापड सादळू नयेत म्हणून करा फक्त ३ गोष्टी

ब्रेसलेट, जाडसर चोकर आणि कानातले असे साधे पण आकर्षक दागिने आणि ग्लॉसी मेकअप केलेली मलायका या साडीत आकर्षक दिसत आहे.  
 

Web Title: Malaika Arora's lime green Banarasi saree from Anita Dongare's collection worth Rs. 75 thousand 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.