अभिनेत्री श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी खुशी कपूर आता बॉलीवूडमध्ये दमदार पदार्पण करून तिची ओळख निर्माण करण्यासाठी सज्ज झालेली आहे. आईच्या पावलावर पाऊल ठेवून श्रीदेवीच्या दोन्ही मुली म्हणजेच जान्हवी आणि खुशी अभिनय क्षेत्राकडे वळाल्या. त्यापैकी जान्हवी आता बॉलीवूडमध्ये बऱ्यापैकी स्थिरस्थावर झाली असून खुशीचेही प्रयत्न त्याच दिशेने सुरु आहे. अशातच तिच्या आगामी चित्रपटाच्या प्रमाेशनानिमित्त अनेक कार्यक्रम होत असून एका कार्यक्रमादरम्यान तिने चमकदार लाल रंगाचा अतिशय सुंदर मिडी ड्रेस घातला होता. हा ड्रेस तसं पाहायला गेलं तर अतिशय महागडा असून त्याची किंमत ४९५० रुपये आहे. पण सध्या या ड्रेसवर प्रचंड डिस्काउंट असून तो फक्त ९९९ रुपयांना मिळत आहे. हा ड्रेस नेमका कसा आहे आणि तो तुम्ही कुठून घेऊ शकता ते पाहा...(Khushi Kapoor's red mini dress costs only 990 right now)
खुशी कपूरने जो लाल रंगाचा ड्रेस घातला आहे तो कोणत्याही महाविद्यालयीन तरुणीला आवडू शकतो असाच आहे. या ड्रेसला स्टायलिश टर्टल नेक देण्यात आला असून तो स्लिव्हलेस आहे.
फुलाफुलांचा काळा फ्रॉक घालून डकोटा जॉन्सन फिरली मुंबई, तिच्या ड्रेसची किंमत हाेती....
त्यामुळे हा ड्रेस घालणाऱ्या तरुणीला किंवा महिलेला नक्कीच स्मार्ट लूक मिळेल. हा ड्रेस जर एखाद्या पार्टीमध्ये घातला तर नक्कीच तुम्ही चारचौघींमध्ये उठून दिसाल यात वाद नाही. तिचा हा ड्रेस Zara या फॅशन हाऊसचा असून तो Godet Mini Dress ZW Collection या नावाने झाराच्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर उपलब्ध आहे.
या ड्रेसच्या मुळ किमतीवर तब्बल ८० टक्के डिस्काऊंट असून तो लाल आणि काळ्या अशा दोन रंगांमध्ये मिळत आहे. हे दोन्ही रंग कोणत्याही पार्टीवेअर लूकसाठी अतिशय कॅची ठरतात.
डोक्यात खूपच कोंडा झाला? करा सोपा उपाय, ८ दिवसांत कोंडा गायब आणि केस होतील चमकदार
शिवाय हा ड्रेस कॉटनचा असून अतिशय लाईटवेट कपड्यापासून तयार झालेला आहे. एरवी असा भरभरून डिस्काऊंट क्वचितच कधीतरी मिळतो. त्यामुळे जर हा ड्रेस मनापासून आवडला असेल तर लगेच घेऊन टाकायला हरकत नाही.