न्यू ऑर्लिन्स येथे मिस युनिव्हर्स- २०२२ चा दिमाखदार सोहळा (Miss Universe 2022 Grand Finale) नुकताच पार पडला. यंदाचा मिस युनिव्हर्स किताब कोण पटकावणार याकडे सगळ्या जगाचेच लक्ष लागले होते. अखेर तो क्षण आता आणि अमेरिकेची आर बोनी गॅब्रियल (R'bonney Gabriel) या मानाच्या पुरस्काराची विजेती ठरली. तिची निवड झाली आणि २०२१ ची मिस युनिव्हर्स भारताची हरनाज संधू (Harnaaz Sandhu) हिने तिचा मुकूट मोठ्या सन्मानाने गॅब्रियलला घातला. पण या सोहळ्यादरम्यान मिस युनिव्हर्स म्हणून शेवटचा रॅम्पवॉक करणारी हरनाज मात्र अतिशय इमोशनल झाली होती. डोळ्यांतले अश्रू आवरताना ती स्टेजवर अडखळली सुद्धा.. पण तिने कसाबसा स्वत:चा तोल सांभाळला (got emotional and stumbled a bit). तिचा हा व्हिडिओ सध्या सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल (viral video) होत आहे.
वाढत्या वजनामुळे हरनाज झाली होती ट्रोल..
मिस युनिव्हर्स किताब पटकाविल्यानंतर हरनाजवर कौतूकाचा वर्षाव झाला होता. पण पुढच्या २- ३ महिन्यांतच तिला जबरदस्त ट्रोलिंगचा सामना करावा लागला. याचं कारण म्हणजे तिचं वाढलेलं वजन. वाढत्या वजनाविषयी बोलताना हरनाज म्हणाली होती की तिला सेलियाक (Celiac) हा आजार आहे.
हा आजार असणाऱ्या व्यक्तींना ग्लुटेनची ॲलर्जी असते. त्यामुळे अन्न पदार्थांमधील व्हिटॅमिन्स, मिनरल्स त्यांच्या रक्तात शोषले जाताना खूप अडचणी येतात. त्यामुळे या आजारात वजन वाढत जाते आणि ते नियंत्रित ठेवणे खूप अवघड असते.
हरनाजच्या २.५ लाखांच्या लेहेंग्याचीही चर्चा
मिस युनिव्हर्स साेहळ्यातील एका इव्हेंटसाठी हरनाजने पारंपरिक भारतीय धाटणीचा लेहेंगा घातला होता. तिचा हा लेहेंगा खरोखरंच अतिशय सुंदर होता आणि त्यात ती अतिशय आकर्षक दिसत होती. हा लेहेंगा रिंपल आणि हरप्रित नरुला यांच्या कलेक्शनमधला असून त्याची किंमत तब्बल २, ५९, ००० रुपये एवढी सांगितली जाते.