मिस युनिव्हर्स हरनाज संधू नेहमीच तिच्या खास स्टाईलमधले फोटो सोशल मिडियावर शेअर करते आणि पुन्हा एकदा तिचे चाहते नव्याने तिच्या प्रेमात पडतात. वेस्टर्न वेअर असो किंवा मग ट्रॅडिशनल वेअर असो... कोणत्याही प्रकारच्या कपड्यांमध्ये हरनाज स्वत:ला खूप छान पद्धतीने कॅरी करते. आता हेच बघा ना तिचे पिस्ता रंगाच्या साडीतले (green lemon traditional saree) तिचे काही फोटो साेशल मिडियावर शेअर केले असून खूपच कमी वेळात हे फोटो कमालीचे व्हायरल झाले आहेत (Miss Universe Harnaaz Sandhu's stunning ethnic look). सध्या गणपती बसलेले आहेत. यानिमित्ताने कुणाकडे जायचं असेल, पण साडी कशी नेसावी किंवा त्यावरची हेअरस्टाईल, ज्वेलरी, ब्लाऊज कसं असावं, हे कळत नसेल तर हरनाजचा हा देखणा लूक बघा आणि तिच्यासारखी स्टाईल करा..
कशी आहे हरनाजची साडी?आपण टिपिकल काठपदर साडी म्हणतो, त्याच प्रकारातली हरनाजची साडी आहे. पिस्ता किंवा लेमन ग्रीन या रंगाच्या तिच्या साडीचे काठ सोनेरी रंगाचे आहेत. साडी पुर्ण प्लेन असून काठ अतिशय आकर्षक आहेत.
कितीही काळजी घेतली तरी कुंडीतले कडीपत्त्याचे रोप सुकतेच? ३ टिप्स - कडीपत्ता वर्षभर राहील हिरवागार
Shanti Banaras या ब्रॅण्डची ही साडी असून टिशू सिल्क फॅब्रिकमधली आहे. पिस्ता रंगाच्या साडीवर हरनाजने beige रंगाचं स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं आहे. गळ्यात मोत्यांची डबल लेयर माळ असून तसेच मोत्याचे कानातले आहेत. केस मोकळे सोडले असून ग्लॉसी शेडमधला हलकासा मेकअप आहे.
पाळी सुरु होताना आणि त्या ४ दिवसांतही पोट खूप दुखतं? प्या हा खास काढा, मिळेल आराम
गौरींचा सण नुकताच होऊन गेला पण पुढे नवरात्र, दसरा, दिवाळी आणि लग्नसराई आहेच. अशावेळी हरनाजची ही स्टाईल तुम्हाला नक्कीच आकर्षक स्टनिंग एथनिक लूक देणारी ठरू शकते.