प्रसिद्ध बॉलीवुड अभिनेत्री आलिया भट प्रेग्नंट असल्यापासून तिच्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू आहेत. ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनसाठी आणि इतर काही कार्यक्रमांच्या निमित्ताने घराबाहेर पडणाऱ्या आलियावर सर्वांचीच नजर आहे. कधी जीमला जाताना, तर कधी रणबीरसोबत एअरपोर्टवर जाताना आलियाला पापाराजी कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न करत आहेत. आलियाच्या गर्भधारणेविषयी चाहत्यांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. आलियाचे बेबी बंपमधील फोटो, तिचा फॅशन सेन्स, गर्भवती असताना ती करत असलेले काम या सगळ्यांबाबतच बरीच चर्चा आहे. आलियाचे बेबी शॉवर म्हणजेच डोहाळजेवण नुकतेच पार पडले. या लूकमध्ये आलिया अतिशय सुंदर दिसत होती. पिवळ्या धमक रंगाच्या ड्रेसमध्ये तिचे सौंदर्य खुलून आल्याचे दिसत होते (Mom To Be Alia Bhat Spoted in New Footware Style Know the Price of Her Footwear).
मध्यंतरी ब्रम्हास्त्र चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान सोशल मीडियावर रणबीर आणि आलियाचे फोटो आणि व्हिडिओ नुकतेच व्हायरल झाले. यामध्ये आलियाच्या बेबी बंप आणि फॅशनबरोबरच तिच्या हिल्स चपलांचीही बरीच चर्चा झाली. प्रेग्नंट असताना तिने हिल्स घातले असल्याने चाहत्यांनी तिला चांगलेच ट्रोल केले. अनेकांनी तिला अशाप्रकारे हिल्स घालणे आरोग्यासाठी चांगले नाही त्यामुळे ते थांबव असा प्रेमाचा सल्लाही दिला. नुकतेच आलियाचे काही फोटो पुन्हा समोर आले आहेत. यामध्ये आलियाने घातलेल्या पिंक रंगाच्या शॉर्ट ड्रेसची आणि विशेषत: तिने घातलेल्या चपलांची चर्चा होताना दिसत आहे. याचे कारणही तसेच आहे, कारण अगदी साध्या वाटणाऱ्या या चपलांची किंमत खूप जास्त असल्याने नेटीझन्स आश्चर्य व्यक्त करत आहेत.
अतिशय सिंपल अशा पिंक शॉर्ट ड्रेसमध्येही आलिया अतिशय सुंदर दिसत होती. गुलाबी रंगाच्या ड्रेसवर पांढऱ्या रंगाची बारीक फुलं असल्याने या ड्रेसला विशेष स्टाईल नसूनही तो तिच्यावर खुलून दिसत होता. तर आलियाने यावर सोनेरी रंगाच्या जाडसर अशा रींग कानात घातल्या होत्या. तिच्या पांढऱ्या रंगाचे फ्लॅट पण उंच असलेल्या प्लिप-फ्लॉप चपलांनी मात्र तिच्या या लूकची विशेष चर्चा झाली. उंचीला थोडे जास्त पण फ्लॅट असल्याने प्रेग्नन्सीमध्ये या चप्पल कम्फर्टेबल असाव्यात. तसेच त्याचे पट्टेही थोडे जाडसर असल्याने चालताना त्या सोयीच्या असाव्यात. मेलिसा (Melissa) या ब्रँडच्या या चप्पलचा सध्या सेल सुरू असून त्या ३४९९ रुपयांना मिळत आहेत. अन्यथा त्याची नेहमीची किंमत ६९९९ रुपये इतकी आहे. आता बॉलिवूड अभिनेत्री म्हणजे त्या साधंसुधं थोडीच वापरणार आहेत.