Lokmat Sakhi >Fashion > देवीच्या दर्शनाला जाताना पटकन नेसा गुजराती साडी; 5 सोप्या स्टेप्स-गरब्यासाठी आकर्षक लूक मिळेल

देवीच्या दर्शनाला जाताना पटकन नेसा गुजराती साडी; 5 सोप्या स्टेप्स-गरब्यासाठी आकर्षक लूक मिळेल

Navratri Special Gujarati Saree Draping : महाराष्ट्रीयन पद्धतीची गोल साडी नेसताना आपण पदर डाव्या खांद्यावर घेतो. तर गुजराती साडीमध्ये पदर उजव्या खांद्यावर असतो.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2023 11:12 AM2023-10-16T11:12:00+5:302023-10-16T11:15:01+5:30

Navratri Special Gujarati Saree Draping : महाराष्ट्रीयन पद्धतीची गोल साडी नेसताना आपण पदर डाव्या खांद्यावर घेतो. तर गुजराती साडीमध्ये पदर उजव्या खांद्यावर असतो.

Navratri Special Gujarati Saree Draping : How to wear gujrati saree in easy steps | देवीच्या दर्शनाला जाताना पटकन नेसा गुजराती साडी; 5 सोप्या स्टेप्स-गरब्यासाठी आकर्षक लूक मिळेल

देवीच्या दर्शनाला जाताना पटकन नेसा गुजराती साडी; 5 सोप्या स्टेप्स-गरब्यासाठी आकर्षक लूक मिळेल

नवरात्रीच्या (Navratri 2023) ९ दिवसात गरबा खेळायला जाताना किंवा देवीच्या दर्शनासाठी जाताना महिला वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या किंवा ज्वेलरी घालून जातात. नेहमी नेहमी गोल साडी किंवा ड्रेस घालून जाणं नको वाटतं. अशावेळी तुम्ही साधी-सोपी साड्यांची स्टाईल करू शकता.  (Gujrati Saree) गुजराती टाईपची साडी अनेकदा नवरात्रीत नेसली जाते. तर अनेकजणी गरबा खेळण्यासाठी ही साडी नेसून जातात. (How to wear gujrati saree in easy steps)

बऱ्याच महिलांना गरब्याला जाण्यासाठी परफेक्ट गुजराती साडी नेसता येत नाही. गुजराती साडी कशी नेसावी. याच्या  स्टेप्स पाहूया. (How to wear gujrati saree) महाराष्ट्रीयन पद्धतीची गोल साडी नेसताना आपण पदर डाव्या खांद्यावर घेतो. तर गुजराती साडीमध्ये पदर उजव्या खांद्यावर असतो. पदर मागे पिनअप न करता वेगळ्या पद्धतीने पुढे पिनअप केला जातो. (Gujarati Saree Draping)

जर तुम्हाला लेहेंगा स्टाईल साडी नेसायची असेल तर सगळ्यात आधी पदराच्या स्लाईड्स बनवून साडीमध्ये घेर येऊ द्या.  ही स्टाईल प्रत्येक खास प्रसंगासाठी खास दिसेल. घुंगट स्टाईल साडी नेसण्यासाठी तुम्हाला फक्त सिंपल गुजराती साडी नेसल्यानंतर पदर वर घ्यावा लागेल.  हा पारंपारीक गुजराती लूक दिसून येईल. अशी साडी नेसल्यानंतर तुम्ही रोजची कामंही अगदी आरामात करू शकता. 

विकतसारखं जाळीदार, मऊ अप्पम घरीच करा; 7 सोप्या ट्रिक्स-केरळस्टाईल परफेक्ट अप्पम बनेल

१) सगळ्यात आधी एका सुंदर साडीची  निवड करा. तुम्ही जॉर्जेट किंवा शिफॉन साडीची निवड करू शकता. उत्तम लूकसाठी  तुम्ही जड पदर आणि पदरावर हेवी डिजाईन असलेली साडी निवडू शकता.

२) मॅचिंग किंवा कॉन्ट्रस्ट ब्लाऊजसकट योग्य प्रकारच्या पेटिकोटची निवड करा. साडी नेसताना शेपवेअरही वापरू शकता. 

३) ब्लाऊज थ्री फोर स्लिव्हजचे असेल तर अजूनच उठून दिसेल.  पण जर तुमचे दंड फार जाड नसतील तर तुम्ही शॉर्ट ब्लाऊजची निवड करू शकता.

वाटीभर साबुदाण्याचे ५ मिनिटांत करा खमंग अप्पे, उपवासाची सोपी-खमंग रेसिपी, नक्की ट्राय करा

४)  जर तुम्हाला बॉक्स प्लेट्स करायच्या असतील तर समोर थोडं कापड सोडून द्या. पदरासाठी तुम्ही जे कापड सोडले होते.  ते दोन्ही बाजूंनी पकडून व्यवस्थित प्लेट्स  काढून घ्या. पदर कमीत कमी तुमच्या कंबरेच्या खालपर्यंत यायला हवा.

५) ब्लाऊजचे पदर सेफ्टी पीनने व्यवस्थित पॅक करा. मोठ्या निऱ्या ठेवू नका. यामुळे पदर खांद्यावरून सकटल्यासारखा दिसतो. साडी व्यवस्थित बसावी यासाठी तुम्ही कितीही सेफ्टी पिन्सचा वापर करू शकता. फक्त पिना आतल्या बाजूने लावा. बाहेरील बाजूने पिना लावल्यास ते फार विचित्र दिसते.

Web Title: Navratri Special Gujarati Saree Draping : How to wear gujrati saree in easy steps

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.