लग्नात नवरीची साडी, दागिने, गजरे हे इतरांपेक्षा खूप जास्त हेवी असतं. त्या वस्तूंकडे पाहिलं की या वस्तू नवरीच्या आहेत, हे लगेच लक्षात येतं. तसंच नवरीच्या चपलांचंही असतं. नवरीच्या चपला या खूप जास्त हेवी वर्क असणाऱ्या, नाजूक- साजूक तसेच अगदी चमचमत्या असतात. अनेक जणींच्या चपलांना हाय हिल्स असतात. एरवी कधीही अशा चपला न घालणारी मुलगी जेव्हा नवरी होते, तेव्हा अगदी आवर्जून या चपलांची खरेदी करते. कारण त्याच चपला तिच्या नवरीच्या गेटअपला मॅच होणाऱ्या असतात. त्यामुळे त्यांना हिल्स असल्या तरी किंवा त्या नाजूक असल्या तरी अडखळत, धडपडत ती बिचारी त्या चपला घालते (New trend of bridal sneakers). पण आता मात्र हा ट्रेण्ड बदलतो आहे (latest fashion style of Bridal sneakers)...
हो लग्नात नवरीने अशाच पद्धतीच्या नाजूक चपला घालाव्या, हा अलिखित नियम आता बदलला असून त्या चमचमत्या नाजूक चपलांची जागा आता दणकेबाज स्निकर्सनी घेतली आहे.
हा बघा करिना कपूरचा तब्बल ५ लाखांचा चमचमता मेटॅलिक गाऊन, बघा त्या गाऊनची खासियत
लग्नात भरगच्च दागदागिने, गजरे, भरजरी साडी किंवा लेहेंगा घालून तयार झालेली नवरी आणि पायात बूट अशी कल्पनाही काही दिवसांपुर्वी आपण करू शकलो नसतो. पण आता ही कल्पना प्रत्यक्षात आली असून अनेकजणी स्वत:च्या लग्नात स्निकर्स घालण्यास प्राधान्य देत आहेत.
नवरीच्या चपला जशा चमचमत्या असतात, तसेच हे स्निकर्सही छान डेकोरेट केलेले असतात. त्यांच्यावरही कुंदन वर्क, मोती वर्क करून त्यांना सजवलेलं असतं. बऱ्याचदा तर या स्निकर्सला छान हिल्सही देण्यात आलेल्या असतात.
स्वयंपाक करताना असा तडका दिला की वरचा मंडप..... बघा स्वयंपाक करण्याचा हा भन्नाट व्हायरल व्हिडिओ
हल्ली खास लग्नासाठी स्निकर्स कस्टमाईज करून घेण्याचा ट्रेण्डही वाढला आहे. चपला आणि स्निकर्स यांच्यातला फरक एवढाच की स्निकर्स घातल्याने अनेक जणींना अतिशय आरामदायी वाटतं. काही दिवसांपुर्वी अभिनेत्री स्वरा भास्कर हिचे लेहेंग्यावर स्निकर्स घातलेले काही फोटोदेखील सोशल मिडियावर चांगलेच व्हायरल झाले होते.