सोन्याचे, चांदीचे, मोत्यांचे या दागिन्यांच्या बरोबरीने आता प्लॅटिनम, कॉपर गोल्ड, व्हाईट गोल्ड अशा ज्वेलरींचीही चांगलीच चलती आहे. त्यानंतर हल्ली तर ऑक्सिडाईज, थ्रेड, स्टोन, क्रिस्टल असे दागिनेही चांगलेच ट्रेण्डिंग आहेत. पण या सगळ्या दागिन्यांपेक्षाही आता आणखीनच एक वेगळा ट्रेण्ड ज्वेलरी इंडस्ट्रीमध्ये येऊ घातला आहे. गळ्यातले, कानातले, पायातले, नाकातले, अंगठ्या असे वगवेगळे दागिन्यांचे प्रकार आपल्याला माहिती आहेत. पण आता यापेक्षाही एकदम वेगळा प्रकार काही सेलिब्रिटींकडे पाहायला मिळतो आहे आणि तो म्हणजे अंडरबस्ट ज्वेलरी (New trend of Underbust jewellery). ज्वेलरीचा हा प्रकार सध्या जबरदस्त ट्रेण्डिंग असून २०२३ या येत्या वर्षात त्याची क्रेझ आणखीनच वाढलेली असणार अशी चर्चा फॅशन (Fashion in Jewellery) जगतात आहे.
मागच्या महिन्यात प्रियांका जेव्हा भारतात आली होती, तेव्हा तिचा एक लूक चांगलाच चर्चेत होता. त्यावेळच्या तिच्या कपड्यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर पांढऱ्या रंगाचं स्लिव्हलेस क्रॉप टॉप आणि फ्लेअर्ड पॅण्ट असं तिचं ड्रेसिंग होतं.
केस गळणं थांबविण्यासाठी रामदेव बाबा सांगतात २ खास उपाय, केस वाढतील भराभर- राहतील काळेभोर
पण तिच्या कपड्यांपेक्षाही जास्त लक्षवेधी ठरली ती तिने घातलेली अंडरबस्ट ज्वेलरी. तिने घातलेल्या त्या दागिन्यामुळेच तिच्या लूकची चर्चा झाली होती. बहुतेक जणांनी ज्वेलरीचा तो प्रकार पहिल्यांदाच पाहिला होता. तिचा तो ड्रेस Christopher Esber या कलेक्शनमधला होता.
पण त्यानंतर किंग शाहरुख खान याची पत्नी गौरी खानच्या अंगावरही तशाच प्रकारचा दागिना दिसून आला. गौरी खान ही देखील बॉलीवूडमधली एक अतिशय स्टायलिश व्यक्ती म्हणून ओळखली जाते.
तुमचं स्किन केअर रुटीन बदला असं सांगणारे त्वचेतले ३ बदल, वेळीच लक्षणं ओळखली नाही तर त्वचेचे हाल
तिच्या स्टाईलची, तिच्या फॅशनची नेहमीच चर्चाही होते आणि त्याबाबतीत तिला फॉलो करणारेही खूप आहेत. त्यामुळे मार्केटमध्ये आलेला नवा ट्रेण्ड गौरीकडे दिसताेच. म्हणूनच तर मागच्या आठवड्यात मनिष मल्होत्राच्या बर्थ डे पार्टीमध्ये गौरी खानही तशाच प्रकारच्या दागिन्यांमध्ये दिसून आली. गौरीचा ड्रेसही Christopher Esber याच कलेक्शनचा होता.