Join us  

सोन्याच्या ब्लाऊजवर रत्नजडीत काम! बघा नीता अंबानींचा लेकाच्या लग्नातला थाट- फोटो व्हायरल... 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2024 2:04 PM

Anant Ambani- Radhika Merchant's Pre Wedding Ceremony: निळ्याशार लेहेंग्यावर लखलखतं सोन्याचं ब्लाऊज घालून नीता अंबानी आल्या आणि प्रत्येकाच्याच नजरा त्यांनी वेधून घेतल्या...(Nita Ambani wore gold blouse)

ठळक मुद्देत्यांच्या त्या सोन्याच्या ब्लाऊजवर सोन्याच्या धाग्यांनीच वर्क केलेलं होतं, तसंच त्यावर काही महागडी रत्नं आणि मोती, हिरे जडवलेले होते....

उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani and Nita Ambani) यांचा धाकटा मुलगा म्हणजे अनंत अंबानी. सध्या अनंत आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहाची चर्चा अख्ख्या भारतातच नाही तर जगभरात होत आहे. कुटूंबातल्या शेवटच्या सदस्याचं लग्न असलं की घरादाराच्या उत्साहाला उधाण आलेलं असतं. तसंच सध्या अंबानी परिवाराचं झालं आहे. लग्नसोहळ्याशी संबंधित सगळेच कार्यक्रम अतिशय थाटामाटात पार पडत आहेत. आता पुन्हा एकदा नीता अंबानी यांनी असाच एक सुंदर देखणा लूक केला आणि पाहता पाहता त्याची चर्चा देशभरात सुरू झाली. पाहा त्यांचा हा लूक नेमका होता कसा....(Nita Ambani wore gold blouse at Anant Ambani- Radhika Merchant's Pre Wedding Ceremony)

 

अनंत आणि राधिका यांच्या लग्नानिमित्त एका धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी नीता यांनी सेलिब्रिटी डिझायनर अबू जानी संदीप खोसला यांनी डिझाईन केलेला सुंदर निळाशार लेहेंगा घातला होता.

आईचे दागिने लेकीलाही आवडतात! नीता अंबानींचे दागिने इशा घालते हौशीने, पाहा त्या दागिन्यांची झलक

त्यांचा तो लेहेंगा तर अतिशय देखणा होताच. पण त्यापेक्षाही जास्त लक्षवेधी ठरलं ते त्यांनी घातलेलं सोन्याचं ब्लाऊज. त्यांच्या त्या सोन्याच्या ब्लाऊजवर सोन्याच्या धाग्यांनीच वर्क केलेलं होतं, तसंच त्यावर काही महागडी रत्नं आणि मोती, हिरे जडवलेले होते, अशी चर्चा आहे. 

 

सोन्याचं ब्लाऊज घालण्याची नीता अंबानी यांची ही काही पहिलीच वेळ नाही. कारण यापुर्वीही त्यांनी हिरे आणि सोनं असणारं केप ब्लाऊज घातलं होतं.

मुलांना शिकवा ३ गोष्टी, कमी वयातच होतील स्वावलंबी- त्यांच्या गुणांचं सगळ्यांनाच वाटेल कौतुक

हिऱ्यांच्या माळा असणाऱ्या त्यांच्या त्या केप ब्लाऊजला अतिशय नाजूक सोन्याच्या साखळ्या लावून सजवलेलं होतं. त्यावेळी त्यांच्या त्या लूकचीही खूप चर्चा झाली होती. आता अनंतच्या लग्नाच्या निमित्ताने नीता यांचे आणखी किती मोहक रुपं दिसतील, याची उत्सुकता त्यांच्या चाहत्यांना आणि फॉलोअर्सला आहे.

 

टॅग्स :फॅशननीता अंबानीमुकेश अंबानीसाडी नेसणे