Lokmat Sakhi >Fashion > नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी जंगला साडी! साडीचा हा कोणता प्रकार- काय त्याची खासियत?

नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी जंगला साडी! साडीचा हा कोणता प्रकार- काय त्याची खासियत?

Nita Ambani's beautiful look in Banarasai saree: Miss World 2024 या सोहळ्यासाठी नीता अंबानी यांनी बनारसी जंगला साडी नेसली होती. बघा बनारसी साडीतला हा नेमका कोणता प्रकार असतो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2024 04:07 PM2024-03-11T16:07:04+5:302024-03-11T16:07:39+5:30

Nita Ambani's beautiful look in Banarasai saree: Miss World 2024 या सोहळ्यासाठी नीता अंबानी यांनी बनारसी जंगला साडी नेसली होती. बघा बनारसी साडीतला हा नेमका कोणता प्रकार असतो...

Nita Ambani's beautiful look in black Banarasai Jangla saree during Miss World 2024 event, what is banarasi jangla saree? | नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी जंगला साडी! साडीचा हा कोणता प्रकार- काय त्याची खासियत?

नीता अंबानींनी नेसली सुंदर बनारसी जंगला साडी! साडीचा हा कोणता प्रकार- काय त्याची खासियत?

Highlightsदोन विणकरांनी जवळपास दिड महिना मेहनत घेऊन ही साडी तयार केली.

रिलायन्स फाउंडेशनच्या चेअरपर्सन नीता अंबानी यांची स्टाईल आणि त्यांचा फॅशन सेन्स खरोखरच जबरदस्त आहे. त्यामुळे त्यांच्या पेहरावाची नेहमीच चर्चा होत असते. त्यातल्या त्यात साडी आणि ती ही हातमाग पद्धतीने तयार झालेली पारंपरिक धाटणीची साडी हा त्यांचा विशेष आवडीचा पोषाख. या माध्यमातून भारतीय हातमाग उद्योगाला उभारी देण्याचाही त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो. म्हणूनच तर मुलगा अनंत अंबानी (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट यांच्या प्री वेडिंग सोहळ्याच्या शेवटच्या दिवशीही नीता अंबानी यांनी चंदेरी रंगाच्या कांजीवरम साडीची निवड केली होती. आता पुन्हा एकदा नीता अंबानी बनारसी साडीमध्ये दिसून आल्या (Nita Ambani). मिस वर्ल्ड २०२४ (Miss World 2024 event) या सोहळ्यासाठी त्यांनी काळ्या रंगाची बनारसी जंगला साडी नेसली होती. (what is banarasi jangla saree?)

बनारसी जंगला साडी म्हणजे काय?

 

नीता अंबानी यांनी नेसलेली बनारसी जंगला साडी ही खराेखरच अतिशय देखणी, सुंदर होती. बनारसी साड्यांचे जे काही प्रकार आहेत, त्यांच्यामध्ये जंगला साडी ही लगेचच ओळखू येते.

करिना कपूरचा ३ लाखांचा 'इमरान' कोट घडवायला लागले २०० तास, बघा त्यावरची सुंदर नजाकत

कारण तिच्यावरचं वीणकाम अतिशय वेगळ्या पद्धतीने करण्यात येतं. जंगला साडीमध्ये वन किंवा जंगल ही थीम दाखवण्यात येते. त्यामुळे या साडीवर फूलं, पानं असं वेगवेगळं डिझाईन न दाखवता ते वेलींच्या माध्यमातून एकत्र करून दाखवलं जातं. वेलींचं छानसं जाळं किंवा चेक्सही या साडीवर पाहायला मिळतो. 

 

नीता अंबानी यांची जंगला साडी कशी होती?

नीता अंबानी यांची बनारसी जंगला साडी ही चमकदार काळ्या रंगाची होती. साडीवरचं वीणकाम गोल्डन आणि सिल्व्हर धाग्यांनी करण्यात आलं होतं.

उन्हाळ्यात मिरची, भेंडीसह 'या' ७ भाज्यांची रोपं लावा, घरच्या बागेतूनच मिळेल आठवडाभराची ताजी भाजी

काशी येथील राष्ट्रीय पुरस्कार विजेते ज्येष्ठ विणकर Mohammad Islam यांच्या देखरेखीखाली दोन विणकरांनी जवळपास दिड महिना मेहनत घेऊन ही साडी तयार केली. ५ ते ६ हजार या कमीतकमी किमतीपासून बनारसी जंगला साडीची सुरुवात होते. 

 

Web Title: Nita Ambani's beautiful look in black Banarasai Jangla saree during Miss World 2024 event, what is banarasi jangla saree?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.