उद्योजक मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या धाकट्या मुलाचे म्हणजेच अनंत अंबानीचे राधिका मर्चंट हिच्याशी लवकरच लग्न होणार आहे. या विवाहाच्या निमित्ताने दोन प्री वेडिंग सोहळे अगदी थाटामाटात पार पडले. या विवाह सोहळ्यानिमित्त अंबानी परिवारातर्फे गरीब कुटूंबांसाठी सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यासाठी मुकेश अंबानी, नीता अंबानी आणि त्यांच्या कुटूंबातल्या इतर सदस्यांची उपस्थिती होती. यावेळी अंबानी परिवारातल्या इतर कोणत्याही सदस्यापेक्षा सर्वाधिक लक्षवेधी ठरल्या त्या नीता अंबानी (Nita Ambani's Special Look In Red Saree). त्यांचा फॅशन सेन्स, साडीची निवड, चोखंदळ पद्धतीने निवडलेले दागिने यावेळीही सर्वांचेच लक्ष वेधून घेणारे ठरले. (Nita Ambani's red saree with gayatri mantra and beautiful potali with bhagvan shri krishna's design)
नीता अंबानी यांनी जी लाल रंगाची साडी नेसली होती ती बनारसी प्रकारातली होती. त्यांनी नुकतीच काशी येथे भेट दिली. त्यावेळी त्यांनी तिथे अनेक बनारसी साड्या घेतल्या. त्यांनी नेसलेली ती लाल साडीही त्यापैकी एक असल्याचे बोलले जाते.
पिंपल्स, टॅनिंग कमी करण्याचा मस्त उपाय, किचनमधला 'हा' पांढरा पदार्थ चेहऱ्यावर चोळा- सौंदर्य बहरेल
या साडीचं वैशिष्ट्य म्हणते त्या साडीच्या पदरावर सोनेरी धाग्यांनी गायत्री मंत्र विणलेला होता. शिवाय बाकी ठिकाणी सुंदर पक्षी विणले गेले होते. त्यांची ही साडी तर अतिशय आकर्षक होतीच, पण त्यासोबतच त्यांच्याजवळ असणाऱ्या इतर ॲक्सेसरीज देखील अतिशय हटके होत्या.
त्यांनी त्यांच्या साडीच्या रंगाला मॅच होणारी पोटली हातात घेतली होती. त्या लालजर्द पोटलीवरही सोनेरी धाग्यांनी खूप सुंदर वर्क करण्यात आले होते. आजुबाजुला नाजूक वर्क आणि मध्यभागी बासरी वाजविणारा श्रीकृष्ण असं अगदी वेगळं डिझाईन पोटलीवर दिसून आलं.
डोक्यातल्या कोंड्याने वैताग आणला? फक्त २ पदार्थ घेऊन करा 'हा' उपाय, ७ दिवसांत कोंडा कमी
शिवाय त्यांचे कानातलेही खूप खास होते. ते झूम करून पाहिले असता, त्यावर गणपतीचं डिझाईन दिसून आलं, असं काही वाहिन्यांनी म्हटलं आहे. नीता अंबानी यांनी काही वर्षांपुर्वी गणेशोत्सवात घातलेल्या गणपतीचं पेंडंट असणाऱ्या गळातल्याचीही मागे बरीच चर्चा झाली होती. आता या निमित्ताने गणपतीचं डिझाईन असणाऱ्या त्यांच्या कानातल्यांची चर्चा रंगली आहे.