उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Nita Mukesh Ambani) यांच्या धाकट्या मुलाचा म्हणजेच अनंत अंबानीचा (Anant Ambani) आणि राधिका मर्चंट (Radhika Merchant) यांचा विवाहपूर्व सोहळा गुजरातमधील जामनगर (Jamnagar) येथे नुकताच मोठ्या थाटात पार पडला. या सोहळ्यात सहभागी झालेल्या प्रत्येकाचेच कपडे, दागिने पाहण्यासारखे होते. पण तरीही ज्या काही मोजक्या लोकांच्या हटके लूक्सची, देखण्या रुबाबाची चर्चा झाली, त्यातलं एक अग्रगण्य नाव म्हणजे नीता अंबानी. प्री- वेडिंग सोहळ्यातले नीता यांचे सगळेच लूक बघण्यासारखे होते. खासकरून लग्नप्रसंगी त्यांनी नेसलेली मोतीया रंगाची सुुंदर कांचीपुरम साडी आणि त्या साडीत खुलून आलेले सौंदर्य तर अतिशय लक्षवेधी ठरले. (Nita Mukesh Ambani's beautiful look in kanchipuram saree)
भारतीय पारंपरिक कला- संस्कृती यांना प्रोत्साहित करणे, पुढे आणणे यासाठी नीता अंबानी यांचा सदैव प्रयत्न असतो. म्हणूनच तर अनंत आणि राधिकाच्या विवाहपूर्व सोहळातही त्याच प्राचीन कलेची आणि संस्कृतीची झलक दिसावी, असा त्यांचा आग्रह होता.
कशाला पाहिजे विकतचे महागडे स्क्रब? घरातलेच ५ पदार्थ वापरा- टॅनिंग, ब्लॅकहेड्स, व्हाईटहेड्स गायब
स्वत:च्या आचरणातूनही त्यांनी ते दाखवून दिले आणि म्हणूनच लग्नसोहळ्यातील सगळ्यात मुख्य असणाऱ्या हस्ताक्षर सोहळ्यासाठी त्यांनी भारतीय विणकामाचा समृद्ध वारसा सांगणाऱ्या कांचीपुरम साडीची निवड केली होती. मोतिया किंवा सिल्वर रंगाच्या त्या साडीवर चांदी आणि सोन्याची जर वापरून जरदोसी वर्क केलेले होते. साडीच्या काठांवर, पदरावर आणि ब्लाऊजवर अतिशय भरजरी जरदोसी वर्क दिसून आले.
दक्षिण भारतातल्या नामांकित विणकरांनी तयार केलेली ही साडी सेलिब्रिटी डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केली होती. या चंदेरी रंगाच्या साडीवर नीता अंबानी यांनी पाचू आणि हिरे जडवलेला मोठा सेट घातला होता.
उरलेल्या पोळ्यांची कुरकुरीत- चटपटीत भेळ, मोठ्या माणसांसह बच्चे कंपनीलाही आवडेल, बघा रेसिपी
त्या सेटवरचे कानातले, बांगड्या आणि अंगठीदेखील अतिशय देखणी होती. केसांचा अंबाडा आणि त्याला माळलेला गजरा हा त्यांचा लूकही भारतीय संस्कृती आणि परंपरेची ओळख करून देणारा होता.
कांचीपुरम किंवा कांजीवरम साडीची खासियतअतिशय नाजूक आणि सुबक रेशमी काम हे या साडीचे वैशिष्ट्य आहे. या साडीची आणखी एक मुख्य खासियत म्हणजे ही साडी कधीही एकसलग विणण्यात येत नाही. साडी वेगळी विणली जाते आणि साडीचा पदर वेगळा विणला जातो. जेव्हा हे दाेन्ही भाग वेगवेगळे विणून पुर्ण होतात, तेव्हा मग ते एकत्र आणून जोडले जातात. पण हे दोन भाग इतक्या सफाईने एकत्र केलेले असतात, की तुम्ही अतिशय बारकाईने पाहिले तरी त्यांच्यात जोड दिसून येणार नाही. दक्षिण भारतात लग्नप्रसंगी ९५ टक्के महिला कांचीपुरम साडीतच दिसून येतात. त्यामुळेच दक्षिण भारतात या साडीला ब्राईडल सिल्क साडी म्हणूनही ओळखले जाते.