लॉस एंजेलिस येथे आयोजित ९५ व्या ऑस्कर पुरस्कार २०२३ मध्ये संपूर्ण देशाच्या नजरा भारतावर खिळल्या. नुकताच ऑस्कर पुरस्कार सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला. या पुरस्कार सोहोळ्यात ‘नाटू नाटू’ या गाण्याने व ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ या डॉक्युमेंटरी शॉर्ट फिल्मने भारतासाठी ऑस्कर जिंकले. ‘द एलिफंट व्हिस्परर्स’ ही नेटफ्लिक्स डॉक्युमेंटरी असून त्यात सोडून दिलेला हत्ती आणि त्याची काळजी घेणारी व्यक्ती यांच्यातील अतूट बंधन दाखवण्यात आले आहे. या डॉक्युमेंटरीच्या निर्मात्या पंजाबच्या गुनीत मोंगा आहेत. गुनीत मोंगा साडी नेसून मंचावर ऑस्कर पुरस्कार स्वीकारण्यासाठी गेल्याने त्यांची चांगलीच चर्चा होत आहे(Oscars 2023: Guneet Monga Makes India Proud In A Pink Banarasi Saree As She Collects Trophy For ‘The Elephant Whisperers’).
गुनीत मोंगा यांच्या ऑस्कर पुरस्कार, साडी लूकची चर्चा...
'द एलिफंट व्हिस्परर्स' साठी तिची पहिली ऑस्कर ट्रॉफी स्वीकारताना गुनीत मोंगा स्टेजवर आली, तेव्हा चाहत्यांना तिचा अधिक अभिमान वाटला कारण तिने साडी परिधान केली होती. ऑस्कर सारखा प्रतिष्ठित पुरस्कार स्वीकारण्यासाठी, गुनीत मोंगा स्टेजवर गुलाबी साडीत अवतरल्या. एका भारतीय महिलेने साडी परिधान करुन हा पुरस्कार स्विकारणे हे दृश्य पाहण्यासारखेच होते.
गुनीत मोंगा यांनी परिधान केलेली साडी बनारसी प्रकारांतील असून खूपच सुंदर दिसत होती. या गुलाबी रंगाच्या बनारसी साडीवर गोल्डन रंगांच्या मध्यम आकाराच्या बुट्टयांचे नक्षीकाम केले होते. गुनीत मोंगा यांनी साडीला परफेक्ट मॅच असा त्याच रंगाचा फुल स्लिव्हजचा प्लेन ब्लाऊज परिधान केला होता. बुट्यांचे नक्षीकाम असलेल्या साडीवर प्लेन ब्लाऊज साडीची शोभा अधिकच वाढवतांना दिसत होता. गुनीत मोंगा यांनी या साडीला मॅच होतील असे दागिनेसुद्धा परिधान केले होते. गळ्यांत गोल्डन नेकपीस, हातात गोल्डन बांगड्या, कानांत शोभून दिसणारे गोल्डन इअरिंग्स असा ट्रेडिशनल पण हटके लूक पाहून, त्याची सर्वत्र चर्चा केली जात आहे. यासोबतच गुनीत यांनी न्यूड शेडचा हलकासा मेकअप करुन आपला ऑस्कर पुरस्कार, साडी लूक पूर्ण केला होता.
ऑस्करसारख्या जागतिक पुरस्कार सोहळ्याला उपस्थित सगळ्यांनीच वेस्टर्न लूक दिसणारे कपडे परिधान केले होते. परंतु ही चाकोरी मोडून गुनीत मोंगा स्टेजवर पुरस्कार स्वीकारण्यासाठी चक्क पारंपरिक साडी नेसून उपस्थित होत्या. त्यांच्या या कृत्याने अनेक भारतीयांची त्यांनी मन जिंकली आहेत.