Join us  

छातीचा भाग खूप मोठा दिसतो म्हणून संकोच वाटतो? 6 फॅशन टिप्स, दिसा कॉन्फीडन्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2023 9:48 AM

Outfit Ideas for Heavy Breast : फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी ब्रेस्ट मोठे असतील तर कॅऱी करता येतील असे काही हटके पर्याय सुचवतात

आपण कसे दिसतो, वावरतो यावर आपला कॉन्फीडन्स आणि आपली इमेज ठरते. ऑफीसच्या किंवा कामाच्या ठिकाणी हे अतिशय महत्त्वाचे असते. योग्य ठिकाणी योग्य पद्धतीची फॅशन कॅरी करायला हवी. अनेक जणींना आपण खूप जाड आहोत, बारीक आहोत, आपला कंबरेचा किंवा ब्रेस्टचा भाग खूप लहान किंवा खूप मोठा आहे असा कॉम्प्लेक्स असतो. या कॉप्लेक्समुळे आपण शरीर जास्तीत जास्त झाकण्याचा प्रयत्न करतो. पण त्यामुळे आपण गबाळे दिसण्याची शक्यता असते. ब्रेस्टचा भाग मोठा आहे असे वाटल्यास आपण ओढणी, स्कार्फ किंवा जॅकेट घालून तो झाकण्याचा प्रयत्न करतो. पण कामात असताना या गोष्टी कॅरी करणे काहीसे अवघड होऊन जाते. इतकेच नाही तर उन्हाळ्याच्या दिवसांत यामुळे गरमही होण्याची शक्यता असते. प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट शिल्पा तोलानी ब्रेस्ट मोठे असतील तर कॅऱी करता येतील असे काही हटके पर्याय सुचवतात, पाहूयात हे पर्याय कोणते (Outfit Ideas for Heavy Breast)...  

१. कॅज्युअल शर्ट

छाती मोठी असेल तर कॅज्युअल शर्ट हा अतिशय उत्तम पर्याय आहे. यामध्ये चेक्स, डेनिम, वेगवेगळ्या डिझाईन्स आणि पॅटर्नचे बरेच शर्ट बाजारात मिळतात. हे शर्ट मूळातच थोडे ढगळे असल्याने छातीचा भाग खूप मोठा दिसत नाही. 

२. लहान प्रिंटचे कपडे

तुमचा छातीचा भाग मोठा असेल तर तुम्ही मोठ्या प्रिंटचे कपडे अजिबात वापरु नयेत. यामुळे ब्रेस्ट आणखी मोठे दिसण्याची शक्यता असते. अशावेळी जास्तीत जास्त लहान प्रिंट असलेल्या कपड्यांची निवड करावी. 

३. व्ही नेक

गोल गळा किंवा इतर कोणत्याही फॅशनचा गळा असेल तर नकळत आपले ब्रेस्ट मोठे दिसतात. मात्र व्हि नेक म्हणजेच थोडा स्टायलिश आणि उंच असा गळा असेल तर ब्रेस्ट उठून दिसत नाहीत. त्यामुळे व्ही नेक वापरणे केव्हाही चांगले. 

४. शर्ट पॅटर्न

आपण नेहमीच कॉलरचे पॅटर्न वापरतो असे नाही. पण आपले ब्रेस्ट हेवी असतील तर असा पॅटर्न वापरायला हरकत नाही. यामध्ये शॉर्ट ड्रेस, लॉंग ड्रेस, जंपसूट यांमध्ये आपल्याला अशाप्रकारचे कॉलरचे कपडे पाहायला मिळतात. 

५. स्ट्रेट फ्लेअर ड्रेस 

आपला ड्रेस शॉर्ट असेल तर शरीराकडे जास्त लक्ष जाते. पण ड्रेस लाँग असेल तर नकळत ड्रेसच्या पॅटर्नकडे जास्त लक्ष जाते आणि ब्रेस्ट किंवा इतर गोष्टींकडे म्हणावे तितके लक्ष जात नाही. 

६. कफ्तान  

कफ्तान हा असा प्रकार आहे की त्याच्या बाह्या खूप मोठ्या असतात. यामुळे नकळत ते नेहमीच्या कपड्यांपेक्षा काही प्रमाणात ढगळे असतात. ढगळे कपडे असल्याने आपल्या छातीकडे म्हणावे तितके लक्ष जात नाही. म्हणूनच हा पॅटर्न घातल्यास आपण काही प्रमाणात तरी बारीक दिसतो. 

टॅग्स :फॅशनखरेदीमेकअप टिप्स