Lokmat Sakhi >Fashion > तुम्ही घालणार का गोणपाटाचे महागडे ड्रेस? महागड्या ज्यूट कापडाचा नवा ट्रेंड, पोत्याचे कपडेही फॅशनेबल...

तुम्ही घालणार का गोणपाटाचे महागडे ड्रेस? महागड्या ज्यूट कापडाचा नवा ट्रेंड, पोत्याचे कपडेही फॅशनेबल...

Palazzo Made With Jute Bags Costs Rs.60K : Viral Video : ज्यूट क्लॉथ्स किंवा ज्यूट ड्रेसेस हे काही नवीन नाही मात्र आता सस्टेनेबल क्लोदिंगच्या नव्या ट्रेंडने वाढवली....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2023 04:27 PM2023-02-23T16:27:24+5:302023-02-23T16:43:17+5:30

Palazzo Made With Jute Bags Costs Rs.60K : Viral Video : ज्यूट क्लॉथ्स किंवा ज्यूट ड्रेसेस हे काही नवीन नाही मात्र आता सस्टेनेबल क्लोदिंगच्या नव्या ट्रेंडने वाढवली....

Palazzo Made With Jute Bags Costs Rs.60K : Viral Video | तुम्ही घालणार का गोणपाटाचे महागडे ड्रेस? महागड्या ज्यूट कापडाचा नवा ट्रेंड, पोत्याचे कपडेही फॅशनेबल...

तुम्ही घालणार का गोणपाटाचे महागडे ड्रेस? महागड्या ज्यूट कापडाचा नवा ट्रेंड, पोत्याचे कपडेही फॅशनेबल...

"आपण करु ती फॅशन असते" या वाक्याचा सर्वात जास्त वापर फॅशन इंडस्ट्रीमध्येच पाहायला मिळतो. प्रत्येक व्यक्ती आपल्याला आवडेल, रुचेल अशी फॅशन आपापल्या पद्धतीने करत असतो. काहीवेळा काहीतरी अतरंगी फॅशन केल्यामुळे आपण त्या व्यक्तीकडे पाहून भरपूर हसतो. एखाद्याला आवडणारी फॅशन दुसऱ्याला विचित्र वाटू शकते. फॅशनच्या जगात रोज नवनवीन हटके, अतरंगी कपड्यांचे आगळेवेगळे प्रयोग आपल्याला पहायला मिळतात. असाच एक भन्नाट फॅशन प्रकार सध्या नेटकऱ्यांमध्ये खूपच व्हायरल होत आहे. 

आपल्या लहानपणी आपण पोत्यातील उड्या मारण्याचा खेळ नक्कीच खेळाला असाल. त्याचबरोबर कांदा - बटाट्यांची साठवण करण्यासाठी गोणपाटाचा वापर केला जातो. घरातील जुनी झालेली पोती आपण चक्क फेकून न देता त्याचा पायपुसणी म्हणून वापरतो. अशा अनेक महत्वाच्या कामांसाठी गोणपाटाचा वापर केला जातो. सतत वापरुन झाल्यानंतर आपण हे गोणपाट फेकून देतो. परंतु जर या गोणपाटापासून छान, सुंदर फॅशनेबल कपडे तयार करता येऊ शकतात असे आपल्याला कोणी सांगितले तर आपला यावर विश्वास बसणार नाही. या गोणपाटापासून, फॅशनेबल पॅन्ट, शर्ट तयार करता येऊ शकते. तसेच गोणपाटापासून तयार केलेल्या या कपड्यांची किंमत देखील अजबच आहे. नेमका काय आहे हा कपड्यांचा प्रकार, नेमकी काय आहे ही फॅशन पाहूयात(Palazzo Made With Jute Bags Costs Rs.60K : Viral Video).

नक्की काय आहे या व्हायरल व्हिडिओत?
या व्हिडिओत, एक महिला गोणपाटापासून तयार करण्यात आलेली प्लाझो (Plazo) पॅन्ट आपल्याला दाखवत आहे. शेलमी जोसेफ हीने आपल्या life_with_shelmy या इंस्टाग्राम पेजवरून, गोणपाटापासून तयार करण्यात आलेल्या पॅन्टचा व्हिडिओ शेअर केला आहे. तिने एका दुकानात गोणपाटपासून तयार केलेली प्लाझो पॅन्ट पाहिली व लगेच या पॅन्टचा व्हिडीओ काढून सोशल मीडियावर शेअर केला आहे.

या गोणपाटाचा वापर करून मोठी गोणी किंवा पोती बनवली जातात. बहुतेकदा या पोत्यांचा वापर वेगवेगळ्या पद्धतींचा माल एका जागेवरून दुसऱ्या जागेवर नेण्यासाठी केला जातो. ही पोती भरुन ठेवल्यानंतर त्याच्या आत काय आहे हे समजण्यासाठी त्यावर काही मजकूर किंवा मोठे शिक्के मारले जातात. असे हे गोणपाटवर केले जाणारे मार्किंग सुद्धा या प्लाझो पॅन्टवर दिसत आहे. याहून महत्वाची व आश्चर्याचा धक्का देणारी गोष्ट आहे ती म्हणजे या प्लाझो पॅन्टची किंमत. या प्लाझो पॅन्टची किंमत थोडी थोडकी नसून चक्क ६०,००० आहे. या पॅन्टची अवास्तव किंमत दाखवण्यासाठी शेलमीने त्या पॅन्टवरील प्राइज टॅग व्हिडिओमध्ये झूम करुन दाखवले आहे.  

 

हा कापडाचा प्रकार नेमका कोणता ? 
या कापडाच्या प्रकाराला ज्यूट कापड म्हणतात. हे कापड तागाच्या झाडांपासून बनविले जाते. तागाच्या झाडांचा वापर करुन त्यावर प्रक्रिया करुन त्यापासून लांब लचक रश्या बनविल्या जातात. आणि या रश्यांचा वापर करुन ज्यूटचे कापड तयार केले जाते. तागाची झाडे १० फुटांपेक्षा जास्त उंचीवर वाढतात आणि या वनस्पतींपासून मिळणारे तंतू एकाच लांब स्ट्रिंगमध्ये कापले जातात. म्हणून, ज्यूट फायबर हे जगातील सर्वात लांब नैसर्गिक कापड आहे. ज्यूटचे कापड हे इतर कापडांच्या तुलनेत थोडे खडबडीत असते. हे कापड अधिक जाड व लवचिक असल्याकारणाने अधिक काळ टिकते. ज्यूटचे पोशाख तयार करायचे असल्यास त्या कपड्यांचा खडबडीतपणा कमी करण्यासाठी त्यावर अनेक रसायनांच्या प्रक्रिया केल्या जातात. ज्यूट फॅब्रिक हे जगातील सर्वात कमी खर्चिक कापडांपैकी एक आहे. व्हाईट ज्यूट, टॉसा ज्यूट, मेस्टा ज्यूट, ज्यूट कटिंग असे ज्यूटचे अनेक प्रकार उपलब्ध आहेत.

Web Title: Palazzo Made With Jute Bags Costs Rs.60K : Viral Video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :fashionफॅशन