Join us  

परिणितीने लग्नात घातला होता Ecru रंगाचा घागरा, हा कोणता रंग असतो- काय त्याची खासियत?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2023 7:30 PM

Colour Of Parineeti Chopra'S Ghagara or Lehenga: Ecru हे देखील एका रंगाचं नाव असतं, हेच यानिमित्ताने अनेकांना कळलं आहे. बघा नेमका असतो तरी कसा हा रंग.....

ठळक मुद्दे ब्लीच न केलेले सिल्क किंवा लोकर Ecru रंगाची असते.

सेलिब्रिटी आणि त्यांची फॅशन हा सर्वसामान्यांच्या दृष्टीने नेहमीच एक आकर्षणाचा विषय असतो. म्हणूनच तर आता नुकत्याच झालेल्या परिणिती चोप्रा आणि राघव चढ्ढा यांच्या दिमाखदार विवाह सोहळ्याची चांगलीच चर्चा सोशल मिडियावर होत आहे. परिणितीच्या परिणिती आणि राघव यांचे कपडे, वरमाला, परिणितीचे दागिने, मंगळसूत्राचं डिझाईन अशा सगळ्याच गोष्टी सध्या प्रचंड व्हायरल झाल्या आहेत. आता त्यात आणखी एक गोष्ट नव्याने चर्चिली जात आहे. आणि ती म्हणजे परिणितीच्या घागऱ्याचा रंग (What is Ecru colour?). सेलिब्रिटी फॅशन डिझायनर मनिष मल्होत्रा यांनी डिझाईन केलेला हा घागरा Ecru रंगाचा होता. (Parineeti Chopra ties the knot with Raghav Chadha in an ecru-hued lehenga)

 

लाल, पिवळा, हिरवा, निळा असे रंग आपल्याला माहिती आहेत. त्यात आणखी भर म्हणून बेज, टरक्वाईज अशा रंगानाही आपण आता बऱ्यापैकी सरसावलो आहोत. पण परिणितीच्या घागऱ्याचा Ecru रंग मात्र बऱ्याच जणांनी आतापर्यंत ऐकलेला नव्हता.

डोळ्यांभोवती बारीकशा सुरकुत्या आणि डार्क सर्कल्स? २ मिनिटांचा सोपा उपाय, काळी वर्तुळं- सुरकुत्या होतील कमी

वरवर पाहता आपण या रंगाला मोतिया रंग म्हणून ओळखूू. पण हा रंग अत्यंत वेगळा असून तो ग्रेईश पिवळ्या रंगात मोडतो. ग्रे- पिवळा हे त्याचे २ मुख्य रंग असले तरी बऱ्याचदा तो ग्रे आणि हिरव्या रंगाच्या अंडरटोनमध्येही दिसतो.

PCOD असल्याने वजन सतत वाढतेय? २ पदार्थ बंद करा, वजन लवकर कमी होईल

म्हणून या रंगाचं वर्णन करताना आपण त्याला बऱ्याचदा ब्राऊनिश किंवा beige रंग म्हणूनही ओळखतो. ब्लीच न केलेले सिल्क किंवा लोकर Ecru रंगाची असते. मनिष मल्होत्रा यांना हा घागरा तयार करायला तब्बल २५०० तास लागले हाेते म्हणे.  

 

 

टॅग्स :फॅशनपरिणीती चोप्रालग्नमनीष मल्होत्रा