अभिनेत्री परिणिती चोप्रा आणि आप नेते राघव चढ्ढा यांच्या विवाहाच्या, तिथल्या शाही थाटाच्या, त्या दोघांच्या कपड्यांच्या अणि दागिन्यांच्या चर्चा अजूनही संपलेल्या नाहीत. त्यात आता पुन्हा परिणिती चोप्राच्या करवा चौथच्या ड्रेसची चर्चा मोठ्या जोमात सुरू झाली आहे (Parineeti Chopra Wore Red Colour Zardosi Anarkali Dress Worth Rs. 1.56 Lakhs). त्याला कारणही अगदी तसंच आहे. कारण परिणितीने या पहिल्या-वहिल्या (first karwa chouth of Parineeti Chopra and Raghav Chadhha) सणासाठी थोडाथोडका नाही तर तब्बल दिड लाखांचा जरदोसी वर्क असलेला अनारकली ड्रेस घेतला आहे.
परिणिती आणि राघव यांनी त्यांचा पहिला करवा चौथ सण कसा साजरा केला, याची उत्सूकता त्यांच्या चाहत्यांना होतीच.
दिवाळीत १ ग्रॅम सोन्याची ठुशी- मोहनमाळ अशा पारंपरिक दागिन्यांची खरेदी करायची? बघा हे सुंदर पर्याय...
त्या दोघांनी त्यांचे काही फोटो नुकतेच सोशल मिडियावर शेअर केले असून त्यात परिणितीचं लग्नानंतर आणखीनच खुललेलं सौंदर्य पाहून तिचे चाहते तिच्यावर आणखीनच फिदा झाले आहेत. त्या फोटोंमध्ये परिणितीने चमकदार लाल रंगाचा अतिशय भरजरी ड्रेस घातला आहे. ड्रेसवरचा कुर्ता अनारकली पॅटर्नचा असून सलवार मात्र पलाझो प्रकारातली आहे. ड्रेसचा समोरचा गळा तसेच बाह्या, ड्रेसचा खालचा काठ आणि सलवार अशा सगळ्यावरच सोनेरी रंगातलं अतिशय भरगच्च जरदोसी वर्क केलं असून त्याव्यतिरिक्त संपूर्ण ड्रेसवर तसेच सलवारवर बारिक बुटी विणलेली आहे.
परिणितीने घातलेला हा लाल ड्रेस प्रसिद्ध डिझायनर मृणालिनी राव यांच्या कलेक्शनमधला असून या ड्रेसची किंमत तब्बल १ लाख ५६ हजार ८०० रुपये एवढी आहे.
स्वयंपाक करताना लक्षात ठेवा फक्त ६ टिप्स, सगळे रोज म्हणतील तू किती सुगरण!
कल्पा सिल्क या प्रकारातला हा ड्रेस असल्याचं वर्णन मृणालिनी यांच्या ऑफिशियल साईटवर आहे. या ड्रेसवर परिणितीने सिल्व्हर रंगातले मोठे झुमके आणि हातात लग्नातला गुलाबी चुडा घातला आहे.