Lokmat Sakhi >Fashion > ब्लाऊज शिवताना टेलरला सांगा ३ गोष्टी; फिटिंग होईल परफेक्ट-गळ्याचा पॅटर्न बिघडणार नाही..

ब्लाऊज शिवताना टेलरला सांगा ३ गोष्टी; फिटिंग होईल परफेक्ट-गळ्याचा पॅटर्न बिघडणार नाही..

Perfect Blouse Stitching Tips : योग्य टेलर शोधून ब्लाऊज शिवणं आणि डिजाईन परफेक्ट बनवणं प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 02:41 PM2023-09-14T14:41:39+5:302023-09-14T14:57:16+5:30

Perfect Blouse Stitching Tips : योग्य टेलर शोधून ब्लाऊज शिवणं आणि डिजाईन परफेक्ट बनवणं प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं.

Perfect Blouse Stitching Tips : Things to tell your tailor before getting the blouse stitched | ब्लाऊज शिवताना टेलरला सांगा ३ गोष्टी; फिटिंग होईल परफेक्ट-गळ्याचा पॅटर्न बिघडणार नाही..

ब्लाऊज शिवताना टेलरला सांगा ३ गोष्टी; फिटिंग होईल परफेक्ट-गळ्याचा पॅटर्न बिघडणार नाही..

सणवाराच्या वेळेस नवनवीन साड्या घेतल्या जातात. ब्लाऊज प्रत्येकजण आपल्याला हव्या त्या पॅटर्नचे ब्लाऊज शिवतो. अनेकदा फिटींग व्यवस्थित बसत नाही.  कधी गळा जास्त लूज होतो तर कधी हात जास्त लांब किंवा शॉर्ट वाटतात. ब्लाऊज शिवायला देण्यापूर्वी तुम्ही कितीही पॅटर्नबद्दल सांगितलं तरी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर ते हवंतसं व्यवस्थित फिटिंगचं नसतं. (Perfect Blouse Stitching Tips)

योग्य टेलर शोधून ब्लाऊज शिवणं आणि डिजाईन परफेक्ट बनवणं प्रत्येकासाठी चॅलेंजिंग असतं. साडी असो किंवा लेहेंगा ब्लाऊज व्यवस्थित शिवलं नसेल तर तुमचा पूर्ण लूक बिघडू शकतो. टेलरकडे ब्लाऊज देण्यापूर्वी तुम्ही काही गोष्टी सांगितल्या तर फिटींग कधीच बिघडणार नाही. (Things to tell your tailoe before getting the blouse stiched)

नेकलाईन डिजाईननुसार ब्लाऊजची लांबी ठरवा

अनेकदा महिला टेलर जसं शिवेल ते उत्तम असेल असं समजून ब्लाऊज शिवायला देताना व्यवस्थित माहिती देत नाही.  बॅकलेस किंवा डिप नेकलाईन कोणतीही डिजाईन असेल तरी आपल्या शरीरानुसार योग्य मेजरमेंट द्या. 

ओठ काळपट दिसतात? मऊ-गुलाबी ओठांसाठी ३ उपाय, लिपबाम-लिपस्टीक लावणंच विसराल

कलर बॅलेंस पाहिल्याशिवाय ब्लाऊजचे कापड घेऊ नका

जर तुम्ही साडीवरचं ब्लाऊज शिवणार नसाल तर अशा कापडाची निवड करा जे वारंवार धुवावी लागणार नाही. साडी किंवा लेहेंग्याबरोबर कॉन्स्ट्रास्ट रंगाची निवड करा. साडीचे पॅटर्न सिंपल असेल तर ब्लाऊज डिजायनर ठेवा. साडी हेवी वर्कची असेल तर ब्लाऊज सिंपल ठेवा.

ब्लाऊजसाठी जड कापडाची निवड नको

ब्लाऊजसाठी अशाच कापडाची निवड करा ज्यातून हवा सहज पास होईल. ब्लाऊज घातल्यानंतर तुम्हाला जास्त घाम येणार नाही याची काळजी घ्या. घाम आल्यानंतर अंडरआर्म्समध्ये घाम जमा होतो. ज्याचे ब्लाऊजवर डाग पडतात. हे टाळण्यासाठी लाईट वेट कापडाची निवड करा.

५ मिनिटांत ब्लॅकहेड्स निघून जातील; लिंबू आणि दह्याचे उपाय, ब्लॅकहेड्स काढताना दुखणारही नाही

बॉडी टाईपनुसार ब्लाऊज डिजाईन निवडा

तुम्ही बॉडी टाईपनुसार ब्लाऊज डिजाईनची निवड करू शकता. जर बोट नेक ब्लाऊज डिजाईन असेल आणि तुमचे खांदे खालच्या बाजूने झुकलेले असतील तर खांद्यावरून ब्लाऊज खाली उतरेल. जर तुमचं बॅक फॅट जास्त असेल तर  बॅकलेस घालणं टाळा. 

स्लिव्हजची फिटिंग २ तपासा

आर्महोलपासून स्लिव्हजच्या पूर्ण डायमीटरपर्यंत सिंगल फिटींग घेतल्यामुळे ब्लाऊज जास्त टाईट किंवा लूस होऊ शकतं. असं न करता फिटिंग कमीत कमी दोनवेळा करावी. स्लिव्हजची फिटींग करताना कमीत कमी अर्धा सेंटीमीटरचं मार्जिन ठेवा. 

Web Title: Perfect Blouse Stitching Tips : Things to tell your tailor before getting the blouse stitched

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.