दिवाळी असो किंवा अन्य कोणताही सणसमारंभ साडी स्त्रीचे सौंदर्य खुलवते यात काही शंकाच नाही. आपण उंच-बुटके, जाड-बारीक कसेही असलो तरी साडीत सौंदर्य खुलूनच येते. मात्र यात एकच गोष्ट महत्वाची ठरते ती म्हणजे साडी किती नीटनेटकी नेसली आहे. याच एका गोष्टीमुळे आजकालच्या मुली साडी नेसायचे टाळतात, कारण त्यांना परफेक्ट साडीलुक हवा असतो पण काही केल्या साडी नीटनेटकी नेसता येत नाही (perfect saree draping tips How to look slim and beautiful in saree Diwali festival).
एवढंच काय वर्षानुवर्ष साडी नेसणार्या महिलांनाही बर्याचदा नीट साडी नेसता येत नाही. त्यामुळे म्हटलं तर साडी नेसणे अवघड आहे आणि म्हटलं तर अगदी सोपं. फक्त साडी नेसताना काही किमान गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात. साडी नेसताना होणार्या छोट्या चुका टाळल्या तर साडीत तुमची फिगरही आकर्षक दिसेल. याशिवाय साडीत तुम्ही छान बारीक दिसू शकाल. म्हणूनच यंदाच्या दिवाळीत तुम्ही साडी नेसायचा प्लॅन करत असाल तर पाहूया कोणत्या चुका टाळायला हव्यात..
साडी नेसताना टाळा या चुका
१. साडीचा पदर घेतल्यावर खाली कंबरेच्या बाजूने अनेकदा काठ दुमडलेला असतो. कारण तो काठ पीनेने फिक्स करताना पिन काठाच्या कडेला नाही तर मध्यभागी लावलेली असते. त्यामुळे काठ मुडपला जातो आणि फार वाईट दिसतो. पण असे होऊ नये तर पिन व्यवस्थित काठाच्या टोकाला लावावी.
२. साडी नेसताना आपण आणखी एक महत्वाची चूक करतो ती म्हणजे निर्या घेताना त्या पिन लावलेल्या काठापासून फार कमी कापड सोडून निर्या घालायला सुरुवात करतो. त्यामुळे पुन्हा कंबरेच्या बाजूला येणार्या चुण्या खराब होतात. त्या ऐवजी व्हीडिओत दाखवल्याप्रमाणे साधारण हातभर कापड सोडून निर्या घ्याव्या. म्हणजे निऱ्यांना पोंगा येत नाही.
३. शेवटच्या निरीनंतर उरलेला थोडासा भाग आपण तसाच आत खोचून देतो. त्यामुळे साडी कितीही नीट नसली तरी आपण जाड दिसतो. त्याऐवजी शेवटची निरी घेताना आतल्या बाजूने जास्तीचे कापड घेऊन मोठी निरी घ्यावी. त्यामुळे त्या बाजूला छान प्लेन लुक येईल.
४. शेवटची महत्वाची टीप म्हणजे नेहमी निर्या आत खोचण्याआधी साडीला उजव्या पायाखाली दाबून मग निर्या खोचव्यात. यामुळे निर्या खाली, साडी वर, आतला पदर बाहेर वगैरे गोष्टी होत नाहीत आणि परफेक्ट स्लीम लूक मिळतो.