जेव्हापासून अंबानी परिवाराशी नातं जोडल्या गेलं, तेव्हापासून कोणत्या ना कोणत्या कारणाने राधिका मर्चंट नेहमीच चर्चेत असते. उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी (Mukesh Ambani And Neeta Ambani) यांचा धाकटा मुलगा अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाह सोहळ्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे सध्या उत्साहात आयोजन केले जात आहे. दोघांच्या लग्नाच्या मेहंदीचा कार्यक्रम (Mehendi ceremony of Anant Ambani and Radhika Merchant) मंगळवारी सायंकाळी थाटामाटात पार पडला. यावेळी सगळी चर्चा सुरू होती ती राधिका मर्चंट हिच्या सौंदर्याची आणि तिच्या अतिशय देखण्या अशा गुलाबी रंगाच्या भरजरी घागऱ्याची (Pink colour lehenga ).
कसा होता राधिकाचा घागरा?
आता अंबानी परिवाराची सून होणार म्हटल्यावर राधिकाच्या घागऱ्याचा थाट तर विचारायलाच नको. सेलिब्रिटी डिझायनर अबू जानी आणि संदीप खोसला यांनी तिचा हा घागरा डिझाईन केला होता.
झुरळांना घराबाहेर काढण्याचा मस्त सुगंधित उपाय, उदबत्तीचा करा खास वापर, बघा १ स्मार्ट ट्रिक
असं म्हटलं जात आहे की हा घागरा तयार करण्यासाठी सिल्क तर वापरलं आहेच, पण त्यासोबतच कित्येक प्रकारचे फॅब्रिकही वापरण्यात आले आहेत. तसेच घागऱ्यावर खूप हेवी प्रमाणात फ्लोरल बुटी वर्क आणि मिरर वर्क करण्यात आलंय. गुलाबी रंगाच्या घागऱ्यावर निळ्या, हिरव्या आणि पिवळ्या रंगाने थ्रेडवर्कही करण्यात आलं होतं. या घागऱ्याची किंमत किती याची माहिती मात्र उपलब्ध नाही.
राधिकाच्या मेकअप आणि दागिन्यांचीही चर्चा
राधिका मर्चंट ही मुळातच देखणी आहे. त्यामुळे एवढा आकर्षक घागरा आणि त्यावर शोभणारा मेकअप आणि दागदागिने यामुळे राधिका खरोखरच सुंदर दिसत होती.
अस्सल पंजाबी चवीची ढाबास्टाईल दाल- मखनी करा घरीच, ही बघा एक चवदार रेसिपी
कुंदन, मोती, वेगवेगळे खडे यांनी जडवलेला मोठा नेकलेस, चेाकर, बिंदी आणि झुमके असे दागिने राधिकाने घातले होते. शिवाय तिने एका बाजूला वळवलेली वेणी घातली होती आणि त्यावरही बऱ्याच हेअर ॲक्सेसरीज लावल्या होत्या. एकंदरीतच राधिकाचा हा लूक चांगलाच जमून आला होता.