Join us

पंजाबी कुडी बनून आलेल्या प्रिटी झिंटाची मोहक अदा!! तिच्या फुलकारी ओढणीची खास बात अशी की....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2025 11:01 IST

Priety Zinta's Fulkari Dupatta: अभिनेत्री प्रिती झिंटाचा पटियाला ड्रेस आणि तिची सुंदर फुलकारी ओढणी सध्या सोशल मीडियावर खूपच व्हायरल होत आहे..(what is the speciality of phulkari work?)

ठळक मुद्देआजही सगळ्यांना आवडणारी ही फुलकारी कला शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा सांगणारी आहे आणि पंजाबी लोकांनी ती मनापासून जपली, वाढवली आहे. 

अभिनेत्री प्रिती झिंटाच्या प्रत्येक लूकमध्ये एक वेगळाच चार्म, ग्रेस असतो.. तिच्यामधला खळखळता उत्साह नेहमीच तिच्या व्यक्तिमत्त्वातून दिसून येत असतो.. आता प्रिती झिंटाचा असाच एक मोहक आणि सुंदर लूक सोशल मीडियावर  खूप व्हायरल  होत आहे. नुकत्याच झालेल्या आयपीएल सामन्यादरम्यान प्रिती झिंटाने पांढरा शुभ्र पटियाला ड्रेस घातला होतो आणि त्यावर गुलाबी, जांभळा, निळसर रंग असणाऱ्या फुलाफुलांची अतिशय सुंदर फुलकारी वर्क असणारी ओढणी घेतली होती. हातात बांगड्या, कपाळावर टिकली आणि मोकळे सोडलेले केस अशा थाटातली प्रिती अगदी पंजाबी कुडी दिसत होती (what is fulkari art?).. तिच्या या लूकच्या निमित्ताने आता पुन्हा एकदा फुलकारी दुपट्ट्याची चर्चाही सोशल मीडियावर रंगली आहे (Priety Zinta's Fulkari Dupatta).. बघा ही कला नेमकी असते कशी...(what is the speciality of phulkari work?)

 

फुलकारी कलाप्रकाराचे वैशिष्ट्य...

फुलकारी हा एम्ब्रॉयडरीचा प्रकार जेवढा सुंदर दिसताे तेवढाच तो महाग असतो. फुलकारी कला ही मुळची पंजाबची. पंजाबमध्ये महत्त्वाच्या सणसमारंभांना तेथील महिला फुलकारी ओढण्या, शाली अंगावर घेतात. नववधूलाही फुलकारी कपडे घालूनच सजवले जाते.

खूपच हडकुळे दिसता- काही केल्या वजन वाढत नाही? चमचाभर मेथ्यांचा 'हा' उपाय करा- तब्येत सुधारेल

त्यामुळे पंजाबमध्ये या कलाप्रकाराचे अतिशय महत्त्व आहे. फुलकारी प्रकारातच बाग नावाचाही एक भरतकामाचा प्रकार दिसून येतो. यामध्ये कपड्यावर एखादा सुंदर बगिचा असावा त्याप्रमाणे फुलाफुलांचे वर्क आणि वेलबुटी केली जाते. या कलेविषयी आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे पंजाबच्या बहुतांश खेडेगावांमध्ये आजही घरात मुलीचा जन्म झाला की तिची आजी किंवा घरातील इतर स्त्रिया तिच्यासाठी फुलकारीचे कपडे तयार करायला घेतात. ती मुलगी लग्नाची होईपर्यंत तिच्यासाठी असे मायेने केलेले कित्येक फुलकारी कपडे तयार झालेले असतात.

 

खेडेगावातील महिला घरातली सगळी कामं आटोपून दुपारच्यावेळी अंगणात एकत्र जमतात आणि पारंपरिक गाणी गात फुलकारी विणत असतात..

तुम्हाला जरा जास्तच घाम येतो? ५ उपाय करून पाहा- घाम येण्याचं प्रमाण कमी होईल

पारंपरिक कलाप्रकार जोपसण्याचा हा एक अतिशय सुंदर प्रकार तिथे नेहमीच पाहायला मिळतो. १७ व्या शतकातील काही साहित्यांमध्ये या कलाप्रकाराचा उल्लेख दिसून येतो. त्यावरूनच हा अंदाज काढता येतो की आजही सगळ्यांना आवडणारी ही फुलकारी कला शेकडो वर्षांचा समृद्ध वारसा सांगणारी आहे आणि पंजाबी लोकांनी ती मनापासून जपली, वाढवली आहे. 

 

टॅग्स :फॅशनप्रीती झिंटास्टायलिंग टिप्सपंजाब