बॉलिवूडची देसी गर्ल अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच कोणत्या ना कोणत्या गोष्टींमुळे सारखी चर्चेत असते. तिची फॅशन स्टाईल, तिचा बिनधास्त रॅम्प वॉक, मुलगी मालती वरचे अफाट प्रेम यांसारख्या अनेक गोष्टींमुळे ती सारखी सोशल मीडियावर झळकत असते. प्रियांका वेळोवेळी आपली छोटी मुलगी मालती हिच्या खास क्षणांचे फोटोज अपलोड करत असते. प्रियांका आणि निक यांची लेक नुकतीच एक वर्षांची झाली आहे. यानंतर पहिल्यांदाच प्रियांकाने मालती मेरीचा चेहरा चाहत्यांना दाखवला होता. प्रियांकाने वर्षभर आपल्या मुलीचा चेहरा चाहत्यांना दाखवला नव्हता. त्यानंतर मात्र स्वतः प्रियांकाने एक व्हिडीओ शेअर केला होता, यात मालतीची झलक पाहायला मिळाली होती. यानंतर मालती मेरीचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
बॉलिवूडची ‘देसी गर्ल’ अर्थात अभिनेत्री प्रियांका चोप्रा नेहमीच प्रसिद्धी झोतात असते. मात्र, यावेळी प्रियांका नाही तर, तिची लेक मालती मेरी चोप्रा जोनस चर्चेत आली आहे. एरव्ही बॉलिवूड अभिनेत्री जे वेगवेगळ्या प्रकारचे हटके कपडे परिधान करतात, त्याच्या किमती आणि तो लूक सोशल मीडियावर व्हायरल होताना आपण अनेकदा पाहिले असेल. परंतु आता अभिनेत्रींसोबतच त्यांच्या छोट्या स्टारकिड्सनी देखील परिधान केलेले कपडे चर्चेत येत आहेत. प्रियांका चोप्रा व निक जोनस यांची लाडकी लेक मालती हिने परिधान केलेल्या ओव्हरकोटची सर्वत्र चर्चा होताना दिसत आहे(Priyanka Chopra slays in black, Malti rocks a Gucci coat as Nick Jonas holds her in her arms).
मुलगी मालतीच्या ओव्हरकोटची विशेष चर्चा....
प्रियांका चोप्रा सध्या तिच्या आगामी शो सिटाडेलचे प्रमोशन करत आहे आणि निक जोनसला त्याच्या कॉन्सर्टमध्ये चीअर करण्यात व्यस्त असल्याचे दिसत आहे. प्रियांका अलीकडेच निक आणि मुलगी मालती मेरी चोप्रा जोनस सोबत घराबाहेर पडली. त्यावेळी मालती एका गोंडस छोट्या फॅशनिस्टासारखी दिसत होती हे पाहून तिचे चाहते या छोट्याशा मालतीवरील प्रेम व्यक्त करण्यात मागे पडले नाहीत.
प्रियांका चोप्राचा चांदीच्या तारांनी सजलेला बनारसी ब्रोकेड साडीचा ड्रेस, बनवायला लागले ६ महिने...
लेकीचं कौतुक करताना शाहरुख खानही झाला इमोशनल! सुहाना खानची ग्लॅमर जगात एण्ट्री-पाहा फोटो....
प्रियांका नुकतीच तिची छोटी मुलगी मालती आणि नवरा निक जोनस यांच्या सोबत घराबाहेर पडताना कॅमेरात कैद झाली होती. यावेळी काळ्या ओव्हरकोटमध्ये आणि बेज टर्टलनेक टॉपसह मॅचिंग पँटमध्ये प्रियंका फारच स्टायलिश दिसत होती. प्रियांका सोबतच निक जोनस यानेदेखील एकदम हटके लूक घेतला होता. निक व्हाईट हुडी, व्हाईट कॅप आणि डेनिममध्ये अधिकच उठून दिसत होता. यावेळी या छोट्याशा मालतीने निळ्या रंगाचा फ्रॉक घातला होता तसेच या फ्रॉकवर मॅचिंग गुची (Gucci)ओव्हरकोट आणि पायांमध्ये वूलन बूट परिधान केले होते. प्रियांका चोप्रा हिची लेक मालती हिने सुप्रसिद्ध ब्रँड गुची (Gucci) चा ब्राऊन रंगाचा वुलन ओव्हरकोट घातला होता. तिने परिधान केलेल्या या गुची (Gucci) ब्रॅण्डच्या ओव्हरकोटची किंमत सुमारे ७५००० इतकी आहे. या सुंदर ब्राऊन रंगाच्या वुलन ओव्हरकोटमध्ये मालती अधिकच गोंडस दिसत आहे.