Join us  

प्रियांका चोप्राचा चांदीच्या तारांनी सजलेला बनारसी ब्रोकेड साडीचा ड्रेस, बनवायला लागले ६ महिने...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 06, 2023 3:57 PM

Decoding Priyanka Chopra’s ‘upcycled vintage look with a modern twist’ created using a 65-year-old vintage Banarasi patola sari : ६५ वर्षाच्या जुन्या साडीचा अनोखा ड्रेस प्रियांका चोप्राने घातला आणि केला रिक्षाने प्रवास...

'देसी गर्ल' प्रियांका चोप्रा ही बॉलीवूडमध्येच नाही तर हॉलिवूडमध्ये देखील अत्यंत प्रसिद्ध अभिनेत्री आहे. तिने आपल्या दमदार अभिनयाने बॉलीवूड क्षेत्रांत काम करण्यास सुरुवात केली. प्रियांका नेहमीच कोणत्या ना कोणत्या हटके गोष्टींमुळे कायम चर्चेत असते. आत्तापर्यंत प्रियांकाने वेगवेगळ्या प्रकारचे हटके कपडे परिधान केल्याने नेटकऱ्यांमध्ये ती सतत ट्रोल होत रहाते किंवा तिच्या या धाडसाचे कौतुक केले जाते.

सध्या प्रियांका अशाच एका कारणांमुळे व्हायरल होत आहे. नुकताच 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरचा' उद्घाटन सोहळा पार पडला. या उदघाटन सोहळ्याप्रसंगी भारताच्या कानाकोपऱ्यांतून अनेक दिग्गजांनी विशेष कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती दर्शवली. प्रियांका (Priyanka Chopra) आणि तिचा पती निक जोनस यांनीसुद्धा 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी प्रियांकानं एक खास सुंदर असा विंटेज ड्रेस परिधान केला होता. या दोन दिवसीय उदघाटन सोहोळ्यास उपस्थित असलेल्या प्रियांकानं तिच्या ग्लॅमरस लूकने अनेकांचे लक्ष वेधून घेतले होते(Decoding Priyanka Chopra’s ‘upcycled vintage look with a modern twist’ created using a 65-year-old vintage Banarasi patola sari).

प्रियांकाच्या ड्रेसची खास बात... 

'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर'च्या उद्घाटन सोहळ्याच्या दुसऱ्या दिवशी प्रियांकानं विंटेज ड्रेस परिधान केला होता. हा ड्रेस ६५ वर्षांपूर्वीच्या साडीपासून तयार करण्यात आला आहे. प्रियांकानं सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन या ड्रेसच्या खास गोष्टींबाबत सांगितलं. या पोस्टच्या माध्यमातून तिनं ड्रेस डिझायनरचे देखील आभार मानले. या उद्घाटन सोहळ्यामध्ये प्रियांकाने डिझायनर अमित अग्रवाल यांनी डिझाइन केलेला ड्रेस परिधान केला होता. तिने सोशल मीडियावर कार्यक्रमाच्या दुसऱ्या दिवशी परिधान केलेल्या ड्रेसचे अनेक फोटो शेअर करत तिच्या ड्रेसच्या काही खास गोष्टी सांगितल्या आहेत. प्रियांकाच्या विंटेज आणि मॉडर्न टच असलेल्या ड्रेसचं तिच्या चाहत्यांनी कौतुक केलं आहे. अनेकांनी प्रियांकाने शेअर केलेल्या ड्रेसच्या फोटोला लाइक्स आणि भरपूर कमेंट्स केल्या आहेत. 

प्रियांका चोप्राने तिसाव्या वर्षीच केले होते एग्ज फ्रिजिंग! ते नेमके काय असते?

प्रियांकाची इंस्टाग्राम पोस्ट ... 

प्रियांकाने तिच्या ड्रेसचे फोटो सोशल मीडियावर शेअर करुन पोस्टमध्ये लिहिले की, 'हा सुंदर ड्रेस ६५ वर्ष जुन्या विंटेज बनारसी पटोला (ब्रोकेड) साडीपासून बनवण्यात आला आहे. 'हा सुंदर आऊटफिट चांदीच्या धाग्यांनी तयार केलेला आहे. ६५ वर्षे जुन्या बनारसी पटोला साडी आणि खादी सिल्कवर सोन्याचे इलेक्ट्रोप्लेटिंगनं करून हा ड्रेस तयार केला आहे. हा ड्रेस अधिक नजाकतादार करण्यासाठी खूप मेहनत घेतली आहे. वाराणसी क्राफ्ट कल्स्टरमध्ये हातानं विणकाम करत मास्टर पीस साडीचा ड्रेस तयार करण्यासाठी अमित आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सहा महिने लागले होते. यासाठी सर्वांचे आभार.'

हा हटके ड्रेस घालून प्रियांका-निकचा रिक्षातून प्रवास... 

प्रियांकानं या एथिनक ड्रेस घातल्यानंतर चक्क रिक्षा प्रवासाचा आनंद घेतला. रिक्षातून उतरतानाचे फोटो देखील तिनं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो शेअर करताना' प्रियांकानं लिहिलं आहे की, 'माझ्या हक्काच्या माणसासोबत निक सोबत डेट नाईट..' या फोटोंत रिक्षातून उतरताना प्रियांकानं निकबरोबर खास फोटोशूटकेलं आहे. दरम्यान, प्रियांकानं शेअर केलेल्या या फोटोतील रिक्षाचालकाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या फोटोंवर नेटकऱ्यांनी काही गंमतीशीर कॉमेन्ट केल्या आहेत. एकानं लिहिलं आहे की, ' रिक्षावाले काका : तुमचं झालं असे तर आता मी निघू का?' असं एकानं कॉमेंटमध्ये म्हटलं आहे. तर आणखी एकानं लिहिलं की,'रिक्षावाले काका : आधी पैसे द्या', 'कोण आहेत हे लोक? कुठून येतात हे लोक?' असंही एकानं म्हटलं आहे. 

प्रियांका चोप्रासारखा फिटनेस हवा? करा फक्त ६ गोष्टी, बेस्ट फिगरचे सिक्रेट...

बनारसी, पटोला साड्यांविषयी... 

१. बनारसी साडी (Banarasi Saree) :- बनारसमध्ये बनारसी साड्या बनवल्या जातात. बनारसी साड्यांवर सोन्या-चांदीच्या धाग्यांची नक्षी केली जाते, त्यामुळे त्यांची किंमत वाढते. बनारसी साड्या केवळ प्युअर सिल्कच्या तयार केल्या जात असल्या तरी सिल्क व्यतिरिक्त ऑर्गेन्झा आणि जॉर्जेटमध्येही बनारसी साड्या उपलब्ध आहेत. मारवाडी आणि बंगाली कुटुंबात मुलींची लग्ने बनारसी साडीतच केली जातात. बनारसी साड्यांवर फ्लोरल आणि नेचर मोटिफ दिसतो. प्युअर  बनारसी साडी हवी असल्यास ती तयार करायला एक महिना लागतो. बनारसी साड्यांची किंमत सुमारे ४००० रुपयांपासून सुरू होते आणि सहज ५ लाख रुपयांपर्यंत जाऊ शकते.

२. पटोला साडी (Patola Saree) :- पटोला साड्या त्यांच्या चमकदार रंगांमुळे खूप सुंदर दिसतात. त्यावर भौमितिक डिझाईन्स बनवले जातात आणि त्या खास गुजरातमध्येच बनवले जातात. शुद्ध सिल्कपासून बनवलेल्या या साड्या गुजराती नववधूंच्या वॉर्डरोबचा एक महत्त्वाचा भाग आहेत. पटोला साड्यांची खास गोष्ट म्हणजे या साड्या अनेक वर्षांनंतरही अगदी नवीन दिसतात. पटोला साडीची किंमत ३००० रुपयांपासून सुरू होते आणि १ लाख रुपयांपर्यंत जाते. ही एक साडी तयार व्हायला महिने लागतात.

टॅग्स :फॅशन