'बडे लोग बडी बाते' असं म्हणतात, ते काही उगाच नाही. आता बघा ना ६२ हजार रुपयांमध्ये सर्वसामान्यांचे वर्षभराचे कपडे खरेदी करून होऊ शकतात. पण विश्वसुंदरी अभिनेत्री प्रियांका चोप्रा (Priyanka Chopra) हिची बातच वेगळी. त्याचं कारण असं की प्रियांका आणि तिचा पती निक जोनास (Nick Jonas) यांचे नुकतेच पोस्ट झालेले काही फोटो सोशल मिडियावर सध्या चांगलेच व्हायरल झाले आहेत. कारण या फोटाेंमध्ये प्रियांका आणि निक यांची जोडी तर छान दिसतेच आहे. पण त्यासोबत गाजणारी आणखी एक गोष्ट आहे.. आणि ती म्हणजे प्रियांकाने घातलेलं काळ्या- पांढऱ्या रंगाचं ब्रालेट टॉप. (Priyanka Chopra's bralette costs ₹62k)
सध्या तिच्या या टॉपचीच जिकडे- तिकडे चर्चा आहे. तिचा पती निक हा मोठा गायक आहे. रविवारी त्याची एक लाईव्ह कॉन्सर्ट होती. या कॉन्सर्टसाठी जाताना प्रियांकाने ते टॉप घातलं होतं.
वडे- भजी होतील कुरकुरीत, खमंग... कोणताही पदार्थ तळताना लक्षात ठेवा ५ महत्त्वाच्या टिप्स
यावेळी निक चमकदार पांढऱ्या रंगाच्या कपड्यांमध्ये होता, तर प्रियांकाने पांढऱ्या आणि काळ्या रंगाचं ब्रालेट टॉप आणि काळ्या रंगाचाच लाँग ए- लाईन स्कर्ट घातला होता. ब्रालेट प्रकारातल्या टॉपचा गळा डीप चौकोनी होता आणि त्याला काळे बेल्ट होते. वरवर पाहिलं तर तिच्या या टॉपवर फक्त काळ्या- चंदेरी रंगाचे चेक्स आहेत असं दिसतं. त्यामुळे त्यात एवढं महागडं काय आहे, असा प्रश्न कुणालाही पडू शकतो. पण या टॉपची खरी गंमत तर पुढेच आहे.
प्रियांकाचं हे टॉप label Nué Studio या जगप्रसिद्ध डिझायनर कलेक्शनमधलं असून या टॉपवर पुढच्या आणि मागच्या बाजुने पुर्णपणे क्रिस्टल वर्क करण्यात आलेलं आहे.
वापरलेली ग्रीन टी- बॅग फेकून देऊ नका, हाताचे सौंदर्य खुलवण्यासाठी वापरा, हात होतील मऊ- मुलायम, सुंदर
काळ्या आणि चंदेरी रंगाचे अनेक क्रिस्टल्स त्याला जडविण्यात आलेले आहेत. यावर प्रियांकाने एक जॅकेटही घातलं आहे. जॅकेट, टॉप, स्कर्ट आणि हायहिल्स अशा थाटात प्रियांका खरोखरंच आकर्षक दिसते आहे.