बॉलिवूडमध्ये काम करत असलेली दीपिका पदुकोण भारतातील सर्वात सुंदर व लोकप्रिय अभिनेत्री मानली जाते. सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री म्हणून तिची बॉलिवूडमध्ये ओळख आहे. 'ओम शांती ओम' या हिंदी चित्रपटांतून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. यानंतर बचना ए हसींनो, पिकू, तमाशा, बाजीराव मस्तानी यांसारखे असंख्य हिट चित्रपट दिले. दीपिकाला चित्रपटांतून जश्या वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका करायला आवडतात तसेच फॅशनच्या बाबतीत देखील ती अतिशय चोखंदळ आहे. दीपिकाला वेस्टर्न आऊटफिट्स सोबत ट्रेडिशनल पद्धतीचे साडी, ड्रेस, कुर्ते घालणे देखील तितकेच आवडते. दीपिका पदुकोण कोणत्याही कार्यक्रमात गेली की सगळ्यांच्या नजरा तिच्याकडे वळतात. खासकरून जेव्हा ती पारंपारिक लूकमध्ये दिसते. दीपिकाचा लूक सगळ्यांचीच मनं जिंकतो(Deepika Padukone In Green Saree With Prettiest Puff-Sleeved Blouse).
पफ स्लिव्हज अर्थात फुगेवाल्या बाह्यांची नवीन फॅशन नेमकी काय आहे...
दीपिका पदुकोणने आता पर्यंत वेगवेगळ्या प्रकारांतील साड्या परिधान केल्या आहेत. तिने परिधान केलेल्या साड्यांची चर्चा तर होतेच, परंतु या प्रत्येक साडीवर हटके पॅटर्नचा ब्लाऊज घालणे देखील दीपिका पसंत करते. सध्या दीपिकाचा हिरव्या रंगांच्या बनारसी साडीतील आणि फुल स्लीव्हचा अतिशय हॉट कट ब्लाऊज लूक व्हयरल होत आहे. गर्द हिरव्या बनारसी साडीवर तिने फिकट हिरव्या रंगाचा पफ - फुल स्लीव्हचा (Puff - Sleeved Blouse) ब्लाऊज परिधान केला आहे. दीपिकाने तिच्या आउटिंगसाठी, हैदराबादचे सुप्रसिद्ध ब्रायडल कपडे डिझायनर शैलेश सिंघानिया यांच्या 'द विंटर रोझ कलेक्शन ' मधून ही गर्द हिरव्या रंगांची देखणी साडी निवडली आहे. हैदराबादस्थित डिझायनरने या साडीबद्दल माहिती सांगताना म्हटले, "ही हिरवी हाताने विणलेली शुद्ध तुतीची सिल्क कडवा बनारसी साडी आहे." या संपूर्ण साडीवर फ्रेंच गुलाबाचे हाताने विणून बारीक नक्षीकाम केले आहे. दीपिकाने या साडीला साजेसा असा ब्लाऊज देखील निवडला आहे. सुंदर फुग्याचा आकाराचा पफ - फुल स्लीव्हचा (Puff - Sleeved Blouse) ब्लाऊज तिने परिधान केला आहे. या ब्लाऊजवर देखील साडीप्रमाणेच फ्रेंच गुलाबांचे बारीक नक्षीकाम केले आहे. दीपिका पदुकोणचा हा लूक पाहून तिचे चाहते थक्क झाले आहेत. दीपिका पदुकोणची ही साडी येत्या काळात ट्रेंडसेटर बनू शकते असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. तिची साडी अगदी सिम्पल होती, जी कोणत्याही चांगल्या फंक्शनमध्ये नेसता येते.
दीपिकाचे साडी प्रेम...
बॉलिवूडमधील सर्वात फॅशनेबल अभिनेत्री म्हणून दीपिका पादुकोण प्रसिद्ध आहे. दीपिकाच्या स्टाइलबाबत सांगायचे झाले तर पोषाख कोणत्याही प्रकारचा असो, स्टाइल स्टेटमेंट चर्चेत राहण्यासाठी आउटफिट हटके पद्धतीने कसे परिधान करायचे; याची चांगली माहिती दीपिकाला आहे. सर्व प्रकारच्या वेशभूषेमध्ये ही अभिनेत्री सुंदर व मोहक दिसते. साडीचा असा कोणताही प्रकार नसेल जो दीपिकाने परिधान केला नसेल. कांजीवरम, सिल्क, प्रिंटेट, बनारसी अशा वेगवेगळ्या साड्या तिने आतापर्यंत परिधान केल्या आहेत.